शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्या भावांचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू; दोघांनी सरपंच म्हणून ३५ वर्षे केले होते नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 12:05 IST

coronavirus death in Nanded वडवणा पंचक्रोशीत परिचित असलेल्या या दोघा भावंडांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

ठळक मुद्देबुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार घेत असलेल्या भावाचा मृत्यू झाला़त्यानंतर अवघ्या तासाभरातच लातूर येथे उपचारादरम्यान मोठ्या भावाचाही अंत

नांदेड : नांदेड तालुक्यातील वडवणा येथील दोन सख्या भावांचा बुधवारी एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघा भावंडाना उभ्या आयुष्यात तिस-या मित्राची गरज पडली नाही़  त्यांचा एकमेकांत एवढा जीव होता की, शेवटचा श्वासही त्यांनी एकाच दिवशी घेतला़

वडवणा पंचक्रोशीत परिचित असलेल्या या दोघा भावंडांना काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यातील ७८ वर्षीय धाकट्या भावावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तर ८० वर्षीय मोठ्या भावाला लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दोघांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू असताना कुटुंबियाचीही मोठी ओढाताण झाली. मात्र तरीही दोघे कोरोनावर मात करून सुखरूपपणे बाहेर येतील  अशी कुटुंबियासह ग्रामस्थांनाही अपेक्षा होती.  डॉक्टरांनी दोघांनाही वाचविण्यासाठी शथीर्चे प्रयत्न केले. मात्र उपचारास प्रतिसाद न दिल्याने या दोन्ही भावांचा बुधवारी एकाच दिवशी मृत्यू झाला. 

बुधवारी सकाळी नांदेड येथे उपचार घेत असलेल्या भावाचा मृत्यू झाला़ त्यानंतर अवघ्या तासाभरातच लातूर येथे उपचारादरम्यान मोठा भाऊही दगावल्याचे वृत्त आल्याने कुटुंबियासह ग्रामस्थांवरही एकच आघात झाला़ नांदेड येथे मृत्यूमुखी पडलेल्या भावावर गोवर्धन घाट स्मशानभूमीत शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले़ तर लातूर येथे मृत्यू झालेल्या भावावर प्रशासनाच्या वतीने तेथेच अंत्यसंस्कार झाले़ नांदेड येथील अंत्यसंस्कार प्रसंगी मुलगा-मुलीसह काही नातेवाईक उपस्थित होते़ मात्र लातूर येथील भावाचा अंत्यसंस्कार नातू असलेला लातूर येथील डॉक्टरच्या उपस्थितीत पार पडला़ या अंत्यसंस्काराला वडवणा येथून एकालाही जाता आले नाही़  विशेष म्हणजे हे दोन्ही भाऊ गावाच्या विकासासाठी कायम आग्रही राहिले. त्यामुळेच ग्रामस्थांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले होते. मोठ्या भावाने सरपंच म्हणून सुमारे २५ वर्षे गावाची धुरा सांभाळली. तर लहान भावानेही १० वर्षे गावाचा सरपंच म्हणून नेतृत्व केले. या दोघाही जणांचा एकाच दिवशी एकाच आजाराने वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNandedनांदेडDeathमृत्यू