शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांनंतर बनारसी देवीची पतीसोबत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:47 IST

बिहारच्या मेहसा येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जात असताना रेल्वेस्थानकावर गर्दीमुळे पतीसोबत ताटातूट झाल्यानंतर पनवेल एक्स्प्रेसने ही महिला नऊ महिन्यांपूर्वी नांदेडला आली होती़

ठळक मुद्देस्टेशनवर झाली होती ताटातूट : डॉक्टर, परिचारिकांनी मनोरुग्णाचा नऊ महिने केला सांभाळ

शिवराज बिचेवार।नांदेड : बिहारच्या मेहसा येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जात असताना रेल्वेस्थानकावर गर्दीमुळे पतीसोबत ताटातूट झाल्यानंतर पनवेल एक्स्प्रेसने ही महिला नऊ महिन्यांपूर्वी नांदेडला आली होती़ अंगावर जखमा घेवून फिरणाऱ्या या महिलेला रेल्वे पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी मनोरुग्ण विभागाच्या डॉक्टर आणि परिचारिकांनी त्यांचा लेकरासारखा सांभाळ केला़ दुसरीकडे डॉक्टर आणि रेल्वे पोलिसांच्या प्रयत्नातून त्या महिलेची पतीसोबत भेट घालून देण्यात आली़ पतीला समोर पाहताच या महिलेचा अश्रूंचा बांध फुटला होता़बनारसी देवी असे मनोरुग्ण महिलेचे नाव आहे़ बिहारमधील मेहंसा गावाजवळ एका खेड्यातील ती रहिवासी आहे़ बनारसी देवी यांच्यावर उपचारासाठी त्यांचा पती मेहंसा येथे घेवून आला होता़ परंतु रेल्वेत गर्दीमुळे या दोघांची ताटातूट झाली़ त्यातच बनारसी देवी दोन वर्षे फिरत होत्या़ नऊ महिन्यांपूर्वी २८ मार्च २०१८ ला त्या पनवेल एक्स्प्रेसने नांदेड रेल्वेस्थानकावर उतरल्या़ तेथेच राहून मिळेल ते खात होत्या़ स्टेशनवरील कोपºयालाच त्यांनी आपला निवारा केला होता़ अंगावर जखमाही होत्या़ दिवसभर स्टेशनवर अंगावर भळभळत्या जखमा घेवून फिरणाºया या महिलेकडे रेल्वे पोलिसांचे लक्ष गेले़ त्यांनी बनारसी देवीला उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले़ या ठिकाणी मनोरुग्ण विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते़ बनारसी देवी स्वत:बद्दल काही सांगू शकत नव्हत्या़ परंतु, त्यांच्या भाषेवरुन त्या बिहारी असाव्यात असा अंदाज डॉक्टरांनी काढला़मानसिक आरोग्य विभागात विभागप्रमुख डॉ़ प्रसाद देशपांडे, सहयोगी प्राध्यापक तथा उपवैद्यकीय अधीक्षक डॉ़प्रदीप बोडके, डॉ़उमेश आत्राम, नर्सिंगच्या कुंभाळकर, वाघ व परिचारिकांनी त्यांचा लेकरासारखा सांभाळ करीत त्यांच्यावर उपचार केले़ त्या बिहारी बोलत असल्यामुळे सर्जरी विभागातील डॉ़ मिश्रा यांची मदत घेण्यात आली़ त्यानंतर बनारसी देवीला दाखल केल्यावेळची कागदपत्रे तपासून त्यावरुन रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्यात आला़ रेल्वे पोलिसांनी बनारसी देवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले़ तसेच मेहसा रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून बनारसी देवी यांच्या कुटुंबियांचा शोध घेतला़ तब्बल २ वर्षे ९ महिन्यानंतर बनारसी देवींची शुक्रवारी आपल्या पतीसोबत भेट झाली़ यावेळी आपल्या पतीला कडकडून मिठी मारत त्यांचा अश्रूंचा बांध फुटला होता़ या ह्दयद्रावक प्रसंगाने डॉक्टर आणि पोनि़ जाधव यांचेही डोळेही पाणावले होते़कुटुंबियांनी सोडली होती परतीची आशा४बनारसी देवी या मनोरुग्ण असून त्या दोन वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्या परत येण्याची आशा सोडली होती़ बनारसी देवी यांचे पती रोजमजुरी करीत असून आर्थिक स्थितीही बेताचीच आहे़ त्यामुळे बेपत्ता झालेल्या बनारसी देवींचा शोध घेण्यासाठी त्यांचे प्रयत्नही अपुरे पडत होते़डॉक्टरांनी केले शर्थीचे प्रयत्न४बनारसी देवी यांच्या अंगावरील जखमा ब-या झाल्यानंतर त्यांच्या बिहारी बोलण्यावरुन डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला़ नऊ महिन्यांपूर्वीची कागदपत्रे तपासून रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला़ त्यानंतर प्रत्येकवेळी महिलेबाबत रेल्वे पोलिसांशी मनोरुग्ण विभागातील डॉक्टर संपर्कात होते़

टॅग्स :Nandedनांदेडrailwayरेल्वेhospitalहॉस्पिटल