शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीवंत जाळण्याचा प्रयत्न: तिघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:53 IST

शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम़ व्ही़ देशपांडे यांनी सुनावली आहे़

ठळक मुद्देशेतीचा वाद : मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथे घडली होती घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम़ व्ही़ देशपांडे यांनी सुनावली आहे़मुदखेड तालुक्यातील दरेगाव येथील बाबाराव सखाराम एडके व मधुकर सखाराम एडके या भावामध्ये गट नंबर २९३ मधील ३ एकर ४ आर शेत जमीनीवरुन वाद होता़ बाबाराव हा नांदेडमध्ये सायकल रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत असे़ बाबारावने या शेतात हायब्रीड ज्वारी लावली होती़ ५ नोव्हेंबर २०११ रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाबाराव नांदेडहून शेतातील कणसे कापण्यासाठी टेम्पोतून मजूर घेऊन गेला होता़ त्यात कुसुमबाई सोनसळे, संगीता जोंधळे, अरुणाबाई पाईकराव, नीलाबाई जोंधळे व इतर चार जणांचा समावेश होता़ हे सर्व जण तेथे पोहोचल्यावर बाबारावचा सख्खा भाऊ मधुकर, त्याची बायको शोभाबाई, ओम मधुकर, माधव सखाराम व अन्य काही जण कत्ती व रॉकेल घेऊन आले आणि त्यांनी वाद घातला़ या शेतात आमचा हिस्सा आहे़ टेम्पो परत घेऊन जा, नाही तर टेम्पो जाळून टाकतो अशी धमकी दिली़ यावेळी मधुकर, माधव, ओम यांनी कत्तीने हल्ला करुन बाबारावला गंभीर जखमी केले़ तसेच शोभाबाईने बाबारावच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ तो जळत असताना मजूर महिलांनी माती टाकून आग विझविली़ या मजूर महिलांनीच नांदेडला त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले, असा जबाब बाबारावने मुदखेड पोलिसांकडे दिला होता़ या घटनेत बाबाराव ५३ टक्के भाजला होता़ त्याच्या जबाबावरुन मुदखेड पोलिसांनी सहा जणांविरुध्द भादंवि ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन पोलीस निरीक्षक पी़. एन. खेडकर यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़जिल्हा न्यायाधीश दुसरे श्रीमती एम . व्ही. देशपांडे यांच्यासमोर दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला़ शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील डी. जी. शिंदे यांनी काम पाहिले़ त्यांनी प्रत्यक्षदर्शींंचा जबाब व सबळ पुराव्या आधारे मधुकर, शोभाबाई व माधव यांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली़

टॅग्स :Courtन्यायालयDeathमृत्यू