शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

देशभर फडकतोय नांदेडचा तिरंगा ध्वज; १५ ऑगस्टसाठी १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जाणार

By भारत दाढेल | Updated: July 22, 2022 19:39 IST

संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात.

- भारत दाढेलनांदेड : यंदा १५ ऑगस्टसाठी देशातील १६ राज्यांत लागणारे राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती केंद्रात अंतिम टप्प्यात आले असून, वेगवेगळ्या आकाराचे १८ हजार राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत.

संपूर्ण देशात नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज निर्माण केले जातात. मराठवाडा खादी ग्रामोद्योेग समितीच्या नांदेड केंद्रात तयार होणारा तिरंगा ध्वज हा देशभर फडकतो. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वजसुद्धा नांदेड येथेच तयार केला जातो. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला मागील वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे दोन वर्षे उत्पन्नात घट झाली होती; परंतु लॉकडाऊनच्या काळातही राष्ट्रध्वज तयार करण्याची प्रक्रिया सुरूच होती. गतवर्षी मंत्रालयावर तर दोन वर्षांपूर्वी लाल किल्ल्यावर फडकणारा राष्ट्रध्वज नांदेडला तयार झाला होता. यावर्षी २ बाय ३ फुटांचे १० हजार, ३ बाय साडेचार फुटांचे ५ हजार व ४ बाय ६ फुटांचे ३ हजार राष्ट्रध्वज तयार केले जात आहेत.

मागील २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त १५ हजार राष्ट्रध्वज तयार केले होते. त्यातून १ कोटी २४ लाख रुपयांचे उत्पन्न झाले होते. सध्या शिवणकामासाठी ६ कामगार परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी नुकतीच बैठक घेऊन प्रत्येक शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी लागणाऱ्या ध्वजांचा पुरवठा खादी ग्रामोद्योग समिती केंद्राकडून केला जाणार आहे. दीड बाय सव्वा दोन फूट आकाराचे १० हजार ध्वज राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती व्यवस्थापक मठपती यांनी दिली.

केंद्राला शासनाच्या मदतीची गरज१९६७ मध्ये मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना झाली. त्यानंतर १९९२ पासून राष्ट्रध्वज निर्मितीचे काम सुरू झाले. कोरोनामुळे मागील दोन-तीन वर्षे केंद्राचे उत्पन्न घटले होते. ते भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. केंद्राला शासनाच्या मदतीची गरज असून, खेळत्या भांडवलासाठी आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे.- महाबळेश्वर मठपती, व्यवस्थापक, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडIndependence Dayस्वातंत्र्य दिन