शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रामा केअर युनिट अखेर मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:25 IST

माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअरसंदर्भात निवेदन सादर केले होते.

ठळक मुद्देप्रस्ताव सादर करण्याचे सहसंचालकांचे उपसंचालकांना आदेश

श्रीक्षेत्र माहूर : माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. याविषयी नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी आरोग्यमंत्र्यांची व सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तीर्थक्षेत्र माहूरमध्ये आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअरसंदर्भात निवेदन सादर केले होते. त्या निवेदनाच्या अनुषंगाने सहसंचालकानी उपसंचालक लातूर यांना एका पत्राद्वारे स्वंयस्पष्ट प्रस्ताव अभिप्रायासह संचालनालयास सादर करण्याचे आदेशित केले आहे.माहूर हे तीर्थक्षेत्र असून शहराची लोकसंख्या २५ हजारांच्या घरात आहे. तालुक्यातील ९२ गावांतील दोन लाख नागरिक व भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी माहूर येथे एकमेव शासकीय ग्रामीण रुग्णालय आहे. दैनंदिन आवागमन करणाऱ्या भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी व तालुक्यातील गोरगरीब, दीन- दलित, आदिवासी, बहुजन नागरिकांच्या सेवेसाठी माहूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे व ट्रामा केअर सेंटरची आवश्यकता आहे. मागील काळात आ. प्रदीप नाईक, नगराध्यक्ष फिरोज दोसाणी नगरसेवक इलियास बावाणी यांनी आरोग्य उपसंचालक लातूर ते मुख्य संचालक, आरोग्यमंत्र्यापर्यंत पाठपुरावा केला होता.या सर्व बाबींचा उल्लेख करून नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी ट्रॉमा केअरसाठी संबंधितांना निवेदन दिले होते. त्या निवेदनाची दाखल घेत ट्रॉमा केअर युनिट मंजुरीबाबत शासनाचे पत्र क्रमांक संकीर्ण २०१८/सं.क्र.२२४(२)आ - ४ दिनाक ५/९/१८ चे संदर्भ देऊन सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) यांनी उपसंचालक लातूर यांना लोकसंख्या, नॅशनल व राष्ट्रीय महामार्गाबाबतची माहिती व अंतर अपघाताचे ३ वर्षांचे प्रमाणपत्र, उपलब्ध शासकीय रुग्णालयाचे अंतर, स्थानिक लोकप्रतिनिधींची मागणी, जागेची उपलब्धता इत्यादी आवश्यक बाबींचा समावेश करून तसा स्वयंस्पष्ट प्रस्ताव अभिप्रायासह आरोग्य संचालनालय मुंबईकडे सादर करावा, असे आदशित केल्याने रेंगाळत पडलेले ट्रॉमा केअर युनिट मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण रूग्णालयाची इमारत झाली जीर्ण

  • आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत माहूर दौ-यावर आले तेव्हाही त्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली होती. मात्र माहूर या तीर्थक्षेत्रावरील ट्रामा केअर सेंटरच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षदा मिळाल्या. याशिवाय आहे त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट असून संपूर्ण इमारत जीर्ण झाली आहे.
  • माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने दररोज हजारो वाहने माहुरात येतात़ अशा वेळी अनेक छोटे, मोठे अपघात होत असतात़ मात्र येथे ग्रामीण रुग्णालयात हव्या त्या सेवा उपलब्ध नसल्याने येथील वैद्यकीय अधिकाºयांना नाईलाजाने रुग्णांना पुसद, यवतमाळ, नांदेडकडे रेफर करावे लागते.
टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटलdeepak sawantदीपक सावंत