शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ट्राय’चे नवीन टेरीफ कार्ड बनले डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:21 IST

ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला.

नांदेड : ब्रॉडकास्ट सेक्टरसाठी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथारिटी आॅफ इंडिया (ट्राय) ने नवीन टेरीफ कार्ड जारी केले. त्यानुसार सर्वसामान्यांचा फायदा त्यात दर्शविण्यात आला. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. केबल पाहणे महाग झाले. महागामोलाच्या प्लॅनचे पैसे भरुनही संबंधित चॅनेल कधी बंद केले जाईल, याचा नेम नाही. याप्रकाराला केबलमालक, संबंधित तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही. त्यामुळे ग्राहक वैतागले आहेत.‘ट्राय’च्या निर्देशानुसार नवीन टेरीफ प्लॅनची आखणी सुरु आहे. वजिराबाद, मोंढा, शिवाजीनगर, श्रीनगर, अशोकनगर, तरोडा खु., व बु., गणेशनगर, पावडेवाडीनाका आदी परिसरातील केबलचालकांचे कर्मचारी टेरीफ प्लॅन घेवून ग्राहकांच्या घरोघरी जात आहेत. प्लॅन फायनल करण्यापूर्वीच अनेकांचे केबल कनेक्शन बंद करण्यात आले. यासाठीची पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही. जेव्हा ग्राहकच स्वत:हून केबलचालकाकडे विचारणा करतो, तक्रार करतो तेव्हा त्याला नियम सांगितला जातो.नियमांची ज्यांना जाण आहे, असे ग्राहक केबल सुरु करण्याची जी प्रक्रिया ती पूर्ण करा, पैसे घ्या आणि केबल सुरु करा, असे संबंधितांना सांगतात, त्यालाही चालक, तांत्रिक कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. तब्बल तीन ते चार दिवस यासाठी घेत आहेत. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करावा लागतो. त्यानंतर फॉर्म भरल्या जातो, पैसे घेतल्या जातात आणि केबल कसेबसे सुरु केले जाते.

  • ही सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही संबंधित चॅनल कधी बंद होईल, याचा नेम नाही. अनेक ग्राहकांना असा अनुभव येत आहे. यासंदर्भात विचारणा करण्याऱ्यालाही व्यवस्थित उत्तरे दिले जात नाहीत. केबलचा तांत्रिक कर्मचारी मालकाकडे तर मालक कंट्रोलरुमकडे बोट दाखवून आम्ही काही करु शकत नाही, आमच्या हाती काही नाही. तुम्ही कंट्रोल रुमला संपर्क करा’, ‘फारतर आमची जिल्हाधिकारी, ट्रायकडे तक्रार करा’ अशी उत्तरे मिळत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. पैसे भरुनही हा वैताग कशासाठी? असा सवाल ग्राहकांचा आहे. अनेकांनी केबल बंद करण्याचा निर्णय घेतला तर काहींचे केबल चालक, तांत्रिक कर्मचारी यांच्याशी वाद होत असल्याचे चित्र आहे.
टॅग्स :NandedनांदेडTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय