शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

नांदेड शहरात वाहतुकीचे तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:37 IST

मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़

ठळक मुद्देफुटपाथ, मुख्य चौकातील अतिक्रमणाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मागील महिनाभरापासून वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील रिक्षाचालकांसह दुचाकीस्वारांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परंतु, मुख्य रस्त्याचे फुटपाथ आणि चौकातील अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा होत आहे़तरोडा नाका ते पोलीस अधीक्षक कार्यालय हा शहरातील मुख्य रस्ता आहे़ नेदरलँडच्या धर्तीवर शहरातील रस्ते उभारण्यात आल्याने सायकल ट्रॅक, फुटपाथसह दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग पोर्च उभारण्यात आला आहे़ परंतु, त्या ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस रौद्र रूप धारण करीत आहे़ शहरातील तरोडा नाका, वर्कशॉप, कलामंदिर आणि देगलूर नाका चौकात सर्वाधिक अतिक्रमण झाले आहे़ यात भाजीपाला, फळविके्रते तसेच दुकानदारांनी फुटपाथ ताब्यात घेवून दुकान मांडले आहे़ अतिक्रमणाकडे महापालिका अधिकारी कानाडोळा करीत असल्याने या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालण्याची गरज आहे़ त्यात मागील रिमझिम पावसाने मोकाट जनावरे आपले बस्तान मुख्य रस्त्यावर मांडत आहेत़ त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहन मार्गस्थ करावे लागत आहे़शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी ६ जुलैपासून रिक्षाचालकांना गणवेश अनिवार्य करून शिस्तीचे धडे दिले जात आहेत़ तर विनाक्रमांक, दादा, मामा, बॉस अशा स्टाईलमध्ये वाहन क्रमांक टाकणाऱ्या वाहनांसह स्टटंबाजावर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे़ परंतु, आजही बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागलेली नाही़शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस शाखा यांनी संयुक्तपणे मोहीम राबविणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर नांदेडकरांनी नियमितपणे सिग्नल आणि वाहतूक नियम पाळण्यासाठी स्वयंस्फूर्तपणे पुढाकार घेण्याची वेळ आली आहे़कलामंदिर भागात बसस्थानक, डॉक्टरलेन असल्याने नागरिकांची अधिक वर्दळ असते़ रिक्षा रस्त्यावर उभी करून प्रवासी भरले जातात़ त्यातच वळण रस्ता घेवून बसस्थानक आणि डॉक्टरलेनमध्ये जाणाºया वाहनधारकांची संख्या अधिक असल्याने येथील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे़---प्रशासनापुढे आव्हानशहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रिक्षाथांबे निश्चित करून बोर्ड लावणे, चौक, फुटपाथचे अतिक्रमण काढणे, सिग्नलव्यवस्था सुरळीत ठेवणे, काही ठिकाणी पर्यायी मार्ग निर्माण करणे़

टॅग्स :NandedनांदेडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसNanded policeनांदेड पोलीस