एकीकडे काेरोना संसर्गाचे भय तर दुसरीकडे जगायचे कसे, हा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. परराज्यातील हे व्यावसायिक गावाकडेही जाऊ शकत नाहीत. कारण त्यांच्याकडे असलेले साहित्य कसे घेऊन जाणार, त्याचा खर्च व त्या ठिकाणी काय करणार, असा दुहेरी पेच त्यांच्यासमोर आहे. आज, उद्या परिस्थिती बदलेल, कोरोना महामारी कमी होईल आणि माणसे बाहेर येतील, या आशेवर ही मंडळी दिवस घालवत आहेत.
चाैकट- ऐन हंगामामध्येच आमच्यावर काळाने ही वेळ आणली आहे. उन्हाळ्यात वर्षाची कमाई करण्यासाठी आम्ही बाहेर पडतो. लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, येथील झगमगाट, लाऊडस्पीकरवरील गाणे या वातावरणाशिवाय आम्ही जगूच शकत नाही. शासनाने आमच्या वेदनांकडे लक्ष द्यावे. - हरीचरण, तेलंगणा. पाळणा व्यावसायिक