नांदेड : सामाजिक क्रांतीचे प्रणेते, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ३ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता अनावरण करण्यात येणार आहे़ या सोहळ्याला शाहूंचे पणतू श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उपस्थिती राहणार आहे़अध्यक्षस्थानी खा. अशोकराव चव्हाण तर पालकमंत्री रामदास कदम, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, इतिहास संशोधक डॉ़जयसिंगराव पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.शहरात पावडेवाडी नाका परिसरात १२ फूट उंचीचा छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. मुंबईच्या सावंत आर्टचे यशवंत सावंत यांनी हा पुतळा तयार केला आहे, तर २०१७ मध्ये मिळालेल्या इतर आवश्यक त्या प्रशासकीय मान्यतेनंतर पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम महापालिकेने २२ जून २०१७ रोजी सुरू केले होते़ गेल्या अनेक दिवसांपासून या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम सुरु होते़ हे काम पूर्ण झाले असून शनिवारी पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे़यावेळी आ. सतीश चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. सतेज पाटील, माजी राज्यमंत्री आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, महापौर शीला भवरे, उपमहापौर विनय गिरडे, सभापती अब्दुल शमीम, विरोधी पक्षनेता गुरप्रितकौर सोडी आदींची उपस्थिती राहणार आहे. या पुतळ्यासाठी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे़ तर परिसर सुशोभिकरणासाठी १ कोटी १० लाख ७३ हजार अन् विद्युत व्यवस्थेसाठी १३ लाख रुपये खर्च केला आहे.
नांदेडात शाहू महाराजांच्या पुतळ्याचे आज अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:38 IST