शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

आज होणार देयकाची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:47 IST

जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणी पुरवठा योजनेचे काम करणा-या सोहेल कन्स्ट्रक्शनने मंगळवारी आपला खुलासा तसेच पाईप खरेदीचे देयक महापालिकेकडे सादर केले आहे. या देयकाची महापालिका तसेच पोलिसांकडून शहानिशा केली जाईल. त्यानंतर या प्रकरणात कारवाईची दिशा निश्चित होईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

ठळक मुद्देठेकेदाराचा खुलासा : मुदतीच्या अंतिम क्षणी सादर केले देयक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जुन्या नांदेडातील होळी प्रभागात पाणी पुरवठा योजनेचे काम करणा-या सोहेल कन्स्ट्रक्शनने मंगळवारी आपला खुलासा तसेच पाईप खरेदीचे देयक महापालिकेकडे सादर केले आहे. या देयकाची महापालिका तसेच पोलिसांकडून शहानिशा केली जाईल. त्यानंतर या प्रकरणात कारवाईची दिशा निश्चित होईल, असे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.प्रभाग १४ होळी येथे दलित वस्तीनिधीतून पाणी पुरवठा योजनेचे काम केले जात आहे. हे काम सोहेल कन्स्ट्रक्शनमार्फत केले जात आहे. सदर कामावरील पाईप चोरीच्या असल्यच्या संशयावरुन इतवारा पोलिसांनी जप्त केले. तसेच एका प्लंबरला ताब्यात घेतले. त्यानंतरच्या घडामोडीत तेलंगणाताील पाईप कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी करुन जवळपास २०० हून अधिक पाईप आपल्या कंपनीचे असल्याचे सांगत पाईप इतवारा ठाण्यात जमा केले.या प्रकरणात महापालिकेने कारवाई करताना काम बंद करण्याचे आदेश दिले. तसेच पाईप खरेदीचे देयकेही मागवले. मंगळवारी सोहेल कन्स्ट्रक्शनचे मो. नजिर यांनी आपला खुलासा व पाईप देयक सादर केले. सदर पाईप नांदेड येथील विजय इंजिनिअरींग सर्व्हीसेस, महालक्ष्मी कॉम्प्लेक्स, उदयनगर येथून खरेदी केल्याचे सांगितले. हे देयके प्राप्त झाल्यानंतर महापालिका सदर देयकाची पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत खात्री केली जाणार आहे. तसेच सदर खुलासा आणि देयक पोलिसांना दिले जाणार आहे. ते पोलिसांनी तपासावे, असे आयुक्तांनी सांगितले. देयकाच्या चौकशीनंतर नेमका काय अहवाल येतो, याकडे लक्ष लागले आहे.आतापर्यंत गुन्हा का दाखल नाही ?- आयुक्तसदर प्रकरणात पोलिसांनी एका प्लंबरला ताब्यात घेतले आहे. तसेच ठिक-ठिकाणाहून पाईपही जप्त केले आहेत. प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले जात असताना पोलिसांनी आतापर्यंत गुन्हा का दाखल केला नाही, असा सवाल आयुक्त देशमुख यांनी उपस्थित केला. पोलिसाकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकाही या प्रकरणात निश्चितपणे ठोस कारवाई करेल, असे म्हणाले. तर दुसरीकडे पोलिसांकडून घटनास्थळ हे नांदेडात नसल्याने येथे गुन्हा दाखल करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ताब्यात घेतलेल्या प्लंबरने पाईप आणण्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानंतर पाईप आणल्याचे चौकशीत सांगितले. त्यामुळे ते पाईप आणण्यास सांगणारा कोण? हा प्रश्न पुढे आला आहे. पोलिसांना अद्यापही तो सापडला नाही. मागील तीन दिवसांतील पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयकल्लोळ निर्माण करणारी ठरली आहे.सहकार्याची भूमिका?पाणी पुरवठ्याच्या कामासाठी चोरुन आणलेल्या पाईपचा वापर केल्या जात असल्याचा ५ मार्च रोजी संशय आला. या संशयानंतर पोलिसांनी पाईप जप्त केले तर महापालिकेनेही ८ मार्च रोजी काम बंद केले. तसेच ९ तारखेला सोहेल कन्स्ट्रक्शनला पाईप खरेदीचे देयक सादर करण्याची नोटीस बजावली. या पहिल्या नोटीसला कंत्राटदाराने केराची टोपली दाखवली. त्यानंतर १२ मार्च रोजी अंतिम नोटीस बजावताना २४ तासाची मुदत दिली होती. त्यानंतर कुठे ठेकेदाराने खुलासा सादर करुन देयक दिले. या देयकाची चौकशी करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडेच सोपवली आहे. या प्रकरणात पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवºयात असताना त्यांच्याकडेच चौकशी सोपवणे हा प्रकार म्हणजे चोराच्या हाती चाव्या, असाच ठरणारा आहे.