लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : समाजकल्याण आयुक्त पुणे, नांदेडच्या समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त यांच्या बनावट स्वाक्ष-या करुन बँकेतून ३ कोटी ८२ लाख रुपये उचलून हडप केल्याप्रकरणी तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवावर वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१७ या काळात संस्थेच्या या तिघांनी हा प्रताप केला होता़याबाबत समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़ त्यानुसार तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक संस्थेचे अध्यक्ष बळीराम कुंडलिक घोरपडे, उपाध्यक्ष ज्ञानदेव गणपत शेवाळे व सचिव दिनकर गणपत शेवाळे या तिघांनी संगनमत करुन समाजकल्याण आयुक्त पुणे व नांदेडच्या समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त भगवान वीर यांच्या नावाच्या बनावट स्वाक्षºया करुन खोटे कागदपत्रे तयार केली़ही कागदपत्रे कलामंदिर परिसरातील सेट्रल बँक आॅफ इंडियामध्ये जमा करुन फेब्रुवारी ते आॅगस्ट या सात महिन्यांच्या कालावधीत तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या नावावर ३ कोटी ८२ लाख ७ हजार ६०० रुपयांचा शासकीय निधी उचलला़ उचललेल्या या सर्व पैशांचा अपहार केला़ या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही बाब उघडकीस आल्यानंतर सहाय्यक आयुक्त भगवान वीर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली़ वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि एस़वाय़धुमाळे यांच्याकडे देण्यात आला आहे़ तपासात आणखी काही विषय समोर येवू शकतात़
तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक संस्थाचालकांनी पावणेचार कोटी हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:28 IST
बनावट स्वाक्ष-या करुन बँकेतून ३ कोटी ८२ लाख रुपये उचलून हडप केल्याप्रकरणी तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवावर वजिराबाद पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तिरुपती मागासवर्गीय औद्योगिक संस्थाचालकांनी पावणेचार कोटी हडपले
ठळक मुद्देतिघांचा प्रताप : संचालक, आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन फसवणूक