शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेलगत वाहनांची कडक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:36 IST

तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त्या सूचना केल्या आहेत.

बिलोली : तालुक्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी १७ मार्च रोजी मध्यरात्री तेलंगणा-महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या कार्ला फाटा व नागणी येथे लावण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताठिकाणी भेटी देवून योग्य त्या सूचना केल्या आहेत.आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही़ तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय जाहिराती फलक, मजकूर, झेंडे आदी लावली जाणार नाही़ आदींवर पोलिसांनी करडी नजर ठेवून तसा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तर निवडणूक कालावधीत परप्रांतातून अवैध दारु, पैसा, निवणुकीला बाधा आणणारे साहित्य आदींची आवक होऊ नये यासाठी बिलोली तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या नागणी व कार्ला फाटा या दोन ठिकाणी १२ पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिवसरात्र तपासणी बंदोबस्त नाका उभारण्यात आला असून या यंत्रणेकडून तेलंगाणा-महाराष्ट्र ये-जा करणाऱ्या वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून आचारसंहितेचा भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकNanded policeनांदेड पोलीस