शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षण विभागाच्या विशेष मोहिमेद्वारे हजार बालके आली शिक्षणाच्या प्रवाहात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 12:08 IST

परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत.

ठळक मुद्देपटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

- अनुराग पोवळे 

नांदेड : परिस्थितीमुळे शाळेपासून दुरावलेल्या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक बालके शाळेच्या मुख्य प्रवाहात आली आहेत. येत्या आठवड्यात शिक्षण विभागाकडून आणखी एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. 

जिल्ह्यात शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी १५ ते ३० जून या कालावधीत राबवलेल्या पटनोंदणी पंधरवडा या विशेष मोहिमेत ४३ हजार ५०० विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यात आली. त्यानंतरही राबवलेल्या मोहिमेत शाळेपासून दुरावलेल्या ९७५ विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले. जिल्ह्यात यंदा बालकांचा शिक्षण हक्क कायद्याचीही अंमलबजावणी प्रभावीरित्या झाल्यामुळे यंदा मागील चार वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक मोफत प्रवेश झाले आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील २६२ शाळांमध्ये दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश मिळाला आहे. २०१३-१४ मध्ये ४९२, २०१४-१५ मध्ये ७०९, २०१५-१६ मध्ये १०५४ आणि २०१६-१७ मध्ये १०२२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला होता. यंदा झालेल्या जनजागृतीमुळे प्रवेशाची संख्या उच्चांकी झाली आहे. 

आईवडिलांच्या रोजगार प्रश्नामुळे शाळेपासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांसाठीही जिल्ह्यात हंगामी वसतिगृह चालवले जातात.या वसतिगृहातही जवळपास अडीच हजार विद्यार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली जाते. हे विद्यार्थी शाळेतच राहावे या हेतूने ३१ मार्चपर्यंत वसतिगृह चालवली जातात. ही वसतिगृह मुखेड, लोहा, कंधार, नायगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू करावी लागतात.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा विशेष मोहीम जिल्ह्यात वीटभट्टी तसेच इतर ठिकाणी कामावर असलेल्या बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणले जाणार आहेत. जिल्ह्यात असलेल्या १०२ विषय तज्ज्ञांमार्फत शाळाबाह्य बालकांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणले जाईल. त्याचप्रमाणे जिल्ह्यात असलेल्या साखर कारखाना परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही परिसरातच शाळा सुरू केली जाणार आहे. जिल्ह्यात आजघडीला येळेगाव, वाघलवाडा, कुंटूर, बा-हाळी, हदगाव येथील कारखाने सुरू होण्याची अपेक्षा आहे.