शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थरारक ! नांदेडमध्ये पोलिसांच्या गोळीबारात गुंड जखमी; अपहृत मुलाची सुखरूप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 14:50 IST

आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देपोलिसांनी मोबाईलवरील संभाषणावरून ओळखले आरोपीलामुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती़ 

नांदेड : लोहा शहरातून एका सोळा वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या मजूर आईला फोनवरून २० लाखांची खंडणी मागणारा अट्टल गुन्हेगार  विकास हटकर पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी झाला आहे. ही घटना नांदेड शहराच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून एक बंदूकही जप्त करण्यात आली आहे़ लोहा शहरातील बालाजी मंदिर परिसरात राहणाऱ्या जमुनाबाई संतोष गिरी यांचा मुलगा शुभम संतोष गिरी (१६) याचे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपहरण केले होते. त्यानंतर जमुनाबाईला २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती़ 

पैसे दिले नाही तर मुलाला ठार मारून टाकू, अशी धमकी दिल्यानंतर जमुनाबाई यांनी लोहा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली़ शुभमचे अपहरण करणारा विष्णुपुरी (ता. नांदेड) येथील अट्टल गुन्हेगार विकास हटकर हा असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याच्या मोबाईल सीडीआरवरून तसेच त्याने केलेल्या फोनवरून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. 

अपहरण केलेल्या युवकाला घेऊन तो नांदेडच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात एका घरात दडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचे पथक निळा रस्त्यावर त्यांचा शोध घेत होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच विकास हटकर अपहरण केलेला मुलगा शुभम गिरी या मुलाला घेऊन पुयनी मार्गे पळत सुटला. 

यावेळी पोलिसांनी त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, तो थांबला नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत शेवटी पायावर गोळी झाडली. यात तो जखमी झाला आणि जागीच कोसळला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घातक शस्त्र जप्त करण्यात आले़ यावेळी घाबरून गेलेल्या शुभम गिरी या अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याला पोलीस पथकाने धीर दिला. जखमी विकास हटकर याला विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या ताब्यातून सुटका करून घेतलेल्या मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले़ याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आठवड्यात जिल्ह्यात गोळीबाराची ही दुसरी घटना असून, पहिल्या फायरिंगमध्ये एक कुख्यात गुंड  ठार झाला होता.  

हटकरवर गंभीर गुन्हेविकास हटकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खुनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मोबाईलवरील संभाषणावरून ओळखले आरोपीलालोहा येथील मुलाचे अपहरण केल्यानंतर त्याची आई जमुनाबाई यांना आरोपीने फोन करून पैशाची मागणी केली होती़ यावेळी तो कॉल रेकॉर्ड करण्यात आला होता़ पोलिसांनी आरोपी विकास हटकर आणि जमुनाबाई यांच्यातील संवाद काळजीपूर्वक ऐकल्यानंतर पैशाची मागणी करणारा फोन विकास हटकर याचा असल्याचे लक्षात आले़ त्यानंतर पोलिसांनी विकास हटकर याच्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन घेऊन त्याचा माग काढला़  

टॅग्स :KidnappingअपहरणNandedनांदेडPoliceपोलिस