नांदेड: मराठा संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांना पोलिसांनी मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो कार्यकर्त्यासह जिल्ह्यातील तिन्ही आमदार आज सकाळपासून रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
मंगळवारी मराठा समाजाच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ आज बैठकीचे आयोजन केले होते. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान शिवाजीनगर दादरा येथे शिवसेना आणि मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येत आहे.