शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी दोन कृषीसेवा दुकाने फोडून बियाणांसह रोख रक्कम पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 17:03 IST

बियाणांच्या ३२ बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या.

ठळक मुद्देदोन दुकानातील ४४  हजाराची रोकड लंपास

उमरी  : शहरातील मोंढा मार्केटमधील कृषीसेवा केंद्राची दोन दुकाने फोडून चोरट्यांनी ४४  हजाराची रोकड व २१ हजारांचे बियाणे असा एकूण ६५  हजारांचा ऐवज चोरून नेला. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

मोंढा बाजारपेठेत संतोष सावंत यांच्या वरद कृषीसेवा केंद्राच्या छतावरील  टिन पत्रे काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. या दुकानातील १२  हजार रुपये रोख व कापूस बियाण्यांच्या पंधरा बॅग चोरून नेल्या.  तसेच या दुकानाला लागूनच असलेल्या आनंद सलगरे यांच्या श्रीराम कृषीसेवा केंद्रात टिनपत्रे काढून चोरटे आत घुसले. दुकानातील ३२  हजार रुपये रोख व कापूस बियाणांच्या १७  बॅग चोरट्यांनी चोरून नेल्या. 

सकाळी दुकान उघडल्यावर चोरी झाल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले. त्यावरून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक अशोक अनंत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोन्ही दुकानांचे पंचनामे करण्यात आले. शहरातील मोंढा मार्केटमध्ये पोलिसांची रात्रीची गस्त बंद असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन  नंतर आता व्यापार सुरु झालेला असतानाच उमरी शहरात चोरट्यांचा हैदोस  वाढला आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीNandedनांदेडFarmerशेतकरी