शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

गोडाऊन फोडून २८ लाखांच्या रेडीमेड कपड्यांची चोरी; शेरवानी, ब्लेझर, जीन्स लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:54 IST

चोरट्यांनी गोदामात तब्बल एक तासभर थांबून शुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस पळवले

ठळक मुद्देनांदेड 'एमआयडीसी' तील गोदाम फोडून चोरट्यांनी लांबवला २८ लाखांचा माल 

नवीन नांदेड: अज्ञात चोरट्यांनी रेडिमेड कपड्याच्या गोदामाचे शटर तोडून गोदामामधील शुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे ड्रेस असे एकूण सुमारे २७ ते २८ लाख रूपयांचा माल चोरून नेला. ही घटना १७ मार्च रोजी सकाळी अकराच्या सुमारास नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रात उघडकीस आली. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रातील डिजॉन कॅज्युअल्स प्रा.लि.चे मालक, व्यवस्थापक तसेच नोकर व कर्मचारी नेहमीप्रमाणे १६ मार्च रोजी सायंकाळी गोदाम आणि किरकोळ विक्रीचे दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान, तोंडाला कापड बांधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी १७ मार्च रोजी पहाटे सव्वातिन ते सव्वाचार वाजेचेदरम्यान, गोदामाचे पाठीमागील शटर वाकवून आत प्रवेश केला. चोरट्यांनी गोदामात तब्बल एक तासभर थांबून शुट, शेरवानी, ब्लेजर, जिन्स व लहान मुलांचे रेडिमेड ड्रेस आणि काउंटरमधील रोख ५०० रुपये चोरून नेले. कपड्यांची किंमत जवळपास २७ ते २८ लाख रूपये असल्याची माहिती मालक दीपक प्रेमचंदाणी तसेच व्यवस्थापक खान इरफानअली यांनी दिली. या घटनेची माहिती समजताच डीवाय.एसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे, प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, 'डीबी' अर्थातच गुन्हे शोधपथकाचे पोउपनि. शेख असद, पोउपनि. गणेश होळकर व त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले.  

विशेष बाब म्हणजे, चोरट्यांनी प्रारंभी गोदामातील सीसीटीव्हीचे वायर तोडून दोन संगणकही चोरून नेले आहेत. याप्रकरणी मुख्य व्यवस्थापक खान इरफान अली अजीज खान यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीच्याआधारे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ठाणे अंमलदार ज्ञानोबा गिते व मदतनीस महिला पो. कॉ. ज्योती आंबटवार यांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीNandedनांदेड