शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

'ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर'; रामदास आठवलेंचा खास शैलीत टोला

By शिवराज बिचेवार | Updated: March 1, 2023 15:52 IST

''मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही.''

नांदेड- ठाकरे गटाचे खा.संजय राऊत यांनी विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा खास चारोळीच्या स्टाईलमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी समाचार घेतला. ते नाहीत चोर, संजय राऊतने करु नये शोर, असे म्हणत त्यांनी कोण चोर आहेत अन् कोण तुरुंगात जाऊन आले हे सर्वांना माहित आहे असा टोला लगाविला.

दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नांदेडात आयोजित कार्यक्रमासाठी बुधवारी आठवले आले होते. यावेळी ते म्हणाले, ठाकरे यांना सोडून गेलेले ते चाळीस आमदार हिम्मतवाले आहेत. न्यायालयाचा निर्णयही त्या आमदारांच्या बाजूनेच लागेल. शिवसेना ही शिंदेचीच आहे. ठाकरे यांना आता शिवसेना नाव आणि चिन्हही वापरता येणार नाही. ही वेळ स्वताहा ठाकरे आणि संजय राऊत यांनी ओढावून घेतली. युतीत निवडणुका लढवून त्यांनी भाजपला आणि आम्हाला धोका दिला. कवाडे हे शिंदे गटात गेल्याबाबत आम्हाला नाराजी नाही. परंतु एकवेळेस आमच्याशी चर्चा करण्याची गरज होती. राज ठाकरे यांना सोबत घेण्यास मात्र आमचा विरोध आहे. मी इथे असताना राज ठाकरेंची काही आवश्यकता नाही. विनाकारण जास्त गर्दी करुन उपयोग नाही. अशी मिष्कील टिपणीही त्यांनी केली. 

वंचितचा प्रभाव पडणार नाही वंचितचे प्रकाश आंबडेकर हे ठाकरे गटासोबत गेले. त्याचा फायदा आम्हालाच होणार आहे. मी जेव्हा गेलो होतो तेव्हाच त्यांनी यायला पाहिजे होते. मुंबई महापालिका निवडणुकीतही वंचितचा फारसा प्रभाव पडेल असे वाटत नाही. फार तर अकोला जिल्ह्यात फायदा होवू शकतो असेही आठवले म्हणाले. यावेळी यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम, गौतम सोनवणे, विजय सोनवणे, महानगराध्यक्ष धम्मपाल धूताडे यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNandedनांदेड