शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
4
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
5
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
6
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
7
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
8
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
9
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
10
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
11
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
12
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
13
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
14
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
15
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
16
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
17
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
18
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
19
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
20
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

महात्मा बसवण्णांनंतर कोणीही जगद्गुरू नाही : अरविंद जत्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:19 IST

बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़

ठळक मुद्देलिंगायत समिती चिंतन बैठक

नांदेड : फक्त जातीने, धर्माने लिंगायत असून चालत नाही तर आपल्या कर्माने आणि आचरणाने लिंगायत असण्याची गरज आहे़ ईश्वराचे प्रतीक असलेल्या इष्टलिंगाला जो आयात करतो तोच लिंगायत होईल. तसेच विश्वगुरू महात्मा बसवण्णा हेच या जगताचे गुरू आहेत़ त्यांच्यानंतर कोणीही जगद्गुरु होऊ शकत नाही़ आपण फक्त त्यांचे कार्य, विचारांचा प्रसार करू शकतो, असे प्रतिपादन चिंतन बैठकीचे अध्यक्ष अरविंद जत्ती यांनी केले़

नांदेड येथील अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती चिंतन बैठकीत ते बोलत होते़ रविवारी बैठकीचे उद्घाटन कुलगुरु डॉ़ उद्धव भोसले यांनी केले़ यावेळी बसव मंच समन्वय समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चन्नबसवानंद महास्वामी, डॉ. व्ही़ एस. शेटे, बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर, माधवराव पाटील टाकळीकर, माधवराव पंडागळे, अशोक मुस्तापुरे, नरेश दरगू, विनोद कांचनगिरे, आनंद कर्णे उपस्थित होते.चन्नबसवानंद  महास्वामी  यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

‘जनगणनेत धर्माचा उल्लेख करा’बैठकीत आगामी जनगणनेत सर्वांनी लिंगायत धर्म असा आवर्जून उल्लेख करावा, असा ठराव करण्यात आला़ या परिषदेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील प्रतिनिधी उपस्थित होते. ़ 

अध्ययन केंद्र सुरू करणारकुलगुरु डॉ़ उद्धव भोसले म्हणाले, चिंतन शिबिराचा फायदा समाजातील सर्वच घटकांना व्हावा, यासाठी प्रयत्न करावे. महात्मा बसवेश्वर यांचे विचार व साहित्य समाजासाठी अतिशय उपयुक्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात लवकरच महात्मा बसवेश्वर अध्ययन केंद्र सुरू करणार आहे. यासाठीच सर्व प्रशासकीय ठराव करून प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

टॅग्स :NandedनांदेडSocialसामाजिक