शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लायगो प्रकल्पामुळे अनेक संधी होणार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:12 AM

भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.

ठळक मुद्देपद्मविभूषण अनिल काकोडकर औंढा येथे भारत-अमेरिकेच्या विद्यमाने लायगो प्रकल्प

नांदेड : भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने औंढा (ना.) येथे लायगो प्रकल्प उभारण्यात येत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये वापरण्यात येणारे तंत्रज्ञान हे अतिप्रगत आहे. विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थी आणि संशोधकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे माजी अध्यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी मंगळवारी त्यांनी विद्यापीठास विशेष भेट दिली. यादरम्यान त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या समवेत विद्यापीठ परिसरातील विज्ञानांतर्गत येणाऱ्या भूशास्त्र संकुल, रसायनशास्त्र, जैवतंत्रशास्त्र आणि भौतिकशास्त्र संकुलास भेट दिली. तेथील प्रयोगशाळेमधील विविध यंत्रांची पाहणी करून विद्यापीठाच्या प्रगतीचे कौतुक केले. यानंतर विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थी यांच्यासमवेत त्यांनी संवाद साधला.याप्रसंगी मंचावर कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.वैजयंता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.काकोडकर म्हणाले, विद्यापीठाने शैक्षणिक दर्जा वाढविण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची सर्वार्थाने प्रगती होण्यासाठी नियमांच्या चौकटीत राहून विकास साधावा. संलग्नित महाविद्यालयांना स्वायत्ता मिळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नशील असावे. स्वतंत्र विद्यापीठ उभारण्यासाठी मदत करावी.चर्चासत्रादरम्यान व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील, डॉ.गजानन झोरे, डॉ. निशिकांत धांडे, डॉ.राजाराम माने, डॉ. तेहरा यांनी प्रश्न विचारले. त्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यापीठातील नवोक्रम केंद्राला राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अनुदान देण्याची विनंती मान्य केली.तसेच जेनेटीक मॉडिफिकेशन (गुणसूत्रीय बदल) तंत्रज्ञानाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी संशोधकांनी पुढाकार घ्यावा व संशोधन विकसित करावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रास्ताविकात विद्यापीठाच्या २५ वर्षांतील विकासात्मक आराखडा सादर केला.सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. अरविंद सरोदे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते़

टॅग्स :Nandedनांदेडscienceविज्ञानswami ramanand tirth marathawada univercity, nandedस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड