शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

...तर काशीपर्यंत पदयात्रा काढून 'काशी' झाल्याचे सांगावे; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 16:25 IST

फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली.

नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे महाआघाडी सरकारकडून भ्रमनिरास झाला असल्यास राजू शेट्टी (Raju Shetty )  यांनी काशीपर्यंत पदयात्रा काढून महाआघाडीत येऊन आपली काशी करून घेतल्याचे सांगावे, असा सल्ला रयत क्रांतीचे आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी दिला. आमदारकीच्या यादीतून नाव गळल्यानंतर शेट्टी यांनी करेक्ट कार्यक्रम करणार या प्रतिक्रियेवर खोत बोलत होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि रयत क्रांतीचे सदाभाऊ खोत यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी दिलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावावर राज्यपालांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचे यादीतील नाव वगळ्याची चर्चा आहे. या प्रकारावर राजू शेट्टी यांनी जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशाराच दिला आहे. यावर आता सदाभाऊ खोत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

सदाभाऊ खोत म्हणाले, फडणवीस सरकारला यापूर्वी पाठिंबा दिला होता, त्या सरकारने दिलेला प्रत्येक शब्द पाळला. परंतु शेट्टी यांनी भ्रमनिरास झाल्याचा आरोप करीत आत्मक्लेश यात्रा काढली. आता म्हणे ते जलसमाधी घेणार आहेत, एक दोन दिवसात ते जलसमाधी घेणार आहेत. पाहू काय होते ते. शेट्टी हे एनडीए प्रवेश करतील काय या प्रश्नावर खोत म्हणाले, त्यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा निर्णय आहे. आतापर्यंत किती पक्ष झाले अन कोणते राहिले याची यादी त्यांच्याकडे असेलच. करेक्ट कार्यक्रम हे उद्गार अपयश आणि उद्विग्नता यातून आले आहेत.

राजू शेट्टी यांनी नाराजी जाहीर केली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या १२ नावांच्या यादीतील राजू शेट्टी यांच्या नावास आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टींचे नाव वगळण्याचा निर्णय घेतल्याचीही एक चर्चा आहे. मात्र, याबाबत अद्याप  राष्ट्रवादीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, राजू शेट्टी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली असून करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी करेन असा इशाराच त्यांनी राष्ट्रवादीला दिला आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेस