शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या मुलाचा त्रास, मारहाण असह्य झाले; आईनेच सुपारी देऊन त्याला कायमच संपवलं

By शिवराज बिचेवार | Updated: August 17, 2022 17:54 IST

अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही मुलगा दारूच्या पैशांसाठी आई वडिलांना मारहाण करून त्रास देत होता.

नांदेड- दारूच्या व्यसनापायी पैशांची मागणी करीत मुलाकडून आई-वडिलांना नेहमी मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे कंटाळलेल्या आईने दोघांना सुपारी देऊन आपल्या पोटच्या मुलाचाच काटा काढला. ही घटना बारड शिवारात घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा केला असून आईसह सुपारी घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. 

१५ ऑगस्ट रोजी बारड शिवारात कॅनॉलच्या शेजारी सुशील त्र्यंबकराव श्रीमंगले याचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पंचनामा केल्यानंतर मयत सुशील याच्या गळ्यावर व्रण आढळून आले. तसेच डोक्यावर मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात बारड पोलिसांनी गुन्हा नोंद केला. मयत सुशील श्रीमंगले हा मजूर असून तो नांदेडच्या गीतानगर येथील रहिवासी होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने आपल्याकडे घेतला. 

पोनि.द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पांडुरंग माने, सपोनि शिवसांब घेवारे, पोउपनि सचिन सोनवणे, दत्तात्रय काळे, पोहेकॉ मारोती तेलंग, गुंडेराव करले, विठ्ठल शेळके, देवा चव्हाण, मोतीराम पवार, महेजबीन शेख, हनुमानसिंह ठाकूर, शेख कलीम यांचे पथक तपास करीत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व प्रथम मयत श्रीमंगले याचे घर गाठून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही भाडेकरूंची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला. 

मयत सुशील श्रीमंगले याला दारूचे व्यसन होते. त्यातून तो आई शोभा श्रीमंगले आणि वडिलांना नेहमी मारहाण करीत होता. अनेकवेळा समजूत घातल्यानंतरही तो दारूच्या पैशांसाठी त्रास देत होता. तसेच घर विकून पैशांची मागणी करीत होता. नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून शोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शोभाबाई यांच्या घरी किरायाने राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि विशाल देवराव भगत या दोघांना त्यासाठी शोभाबाई यांनी सुपारी दिली. त्यानंतर या दोघांनीही सुशीलला बारड परिसरात नेले. या ठिकाणी गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून बारड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

५० हजारांची सुपारीशोभाबाई यांनी मुलगा सुशीलचा खून करण्यासाठी त्यांच्याच घरी भाड्याने राहत असलेल्या राजेश गौतम पाटील आणि त्याचा मित्र विशाल देवराव भगत यांना गळ घातली. त्यासाठी शोभाबाई यांनी दोघांनाही ५० हजार रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे दोघांनीही सुशीलचा खून केला. परंतु पोलिसांच्या चौकशीत बोबडी वळाली अन् ते पोलिसांच्या हाती लागले.

खून करून भगत पुण्यातबारड परिसरात सुशीलचा खून केल्यानंतर विशाल भगत हा पुण्याला पळून गेला होता. तर इकडे पोलिसांनी सुशीलचे घर गाठून राजेश पाटील आणि शोभाबाई यांची कसून चौकशी केली. त्यांच्या चौकशीत खुनाचा उलगडा झाल्यानंतर पुणे येथून विशालला बेड्या ठोकण्यात आल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड