शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आईवडील वाट पाहत राहिले; घराबाहेर पडलेल्या चिमुकल्याचा ३८ तासानंतर मृतदेहच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 12:15 IST

सात वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह कॅनॉल मध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. 

अर्धापूर (नांदेड) : खेळण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या गणपतनगर येथील चिमुकल्याचा तब्बल ३८ तासानंतर कॅनॉलमध्ये मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली. स्वराज संतोष पानपट्टे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. 

अर्धापूर शहरातील तामसा रोडवरील, गणपत नगर येथील स्वराज संतोष पानपट्टे हा ७ वर्षीय चिमुकला बुधवारी सायंकाळी ६:०० वाजता घरातून खेळण्यासाठी बाहेर पडला. बराच वेळानंतरही घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. शेवटी नातेवाईकांनी अर्धापूर पोलीस प्रशासनाला चिमुकला हरवल्याची माहिती दिली. 

पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी लागलीच शोध कार्य सुरु केले. दरम्यान, आज सकाळी ८:१५ वाजता वसमत फाटा महामार्ग चौकीच्यामागे असलेल्या कॅनॉलमध्ये स्वराजचा मृतदेह आढळून आला. तब्बल ३८ तासानंतर स्वराजचा मृतदेह सापडल्याने त्याची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे,पोलीस कर्मचारी महेंद्र डांगे यांच्या सह पंडितराव लंगडे, रेणूक राऊत, कृष्णा लंगडे यांच्यासह अनेकांनी स्वराजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Deathमृत्यूNandedनांदेड