शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूसत्र सुरूच! नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणखी ७ रुग्णांचा मृत्यू, मृतात ४ नवजात

By शिवराज बिचेवार | Updated: October 3, 2023 09:45 IST

मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे.

नांदेड : येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे आणखी ४ नवजातांसह एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील ४८ तासात एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ३१ झाली आहे.

सोमवारी मध्यरात्री १२ ते मंगळवारी मध्यरात्री १२ वाजेदरम्यान म्हणजे मागील २४ तासात आणखी 7 जणांचा मृत्यू झाला. यात ४ नवजात बालक, ३ प्रौढ यांचा समावेश आहे. त्या अगोदरच्या २४ तासात २४ जणाचा मृत्यू झाल्याने अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. आता एकूण मृत्यूंची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.

दरम्यान, आज मंगळवारी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालक मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण संचालक दिलीप म्हेसेकर नांदेडला येऊन रुग्णालयाची पाहणी करणार असल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

मृत्यूची चौकशी कराच, पण ७० गंभीर रुग्णांचे प्राणही वाचवा- नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. मात्र, याच रुग्णालयात ७० रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

चौकशी समिती आज नांदेडमध्ये-सदर घडलेल्या प्रकारानंतर चौकशी समिती आज नांदेडमध्ये येणार आहे. शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील डॉ. भारत चव्हाण, डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. जोशी या तिघांची चौकशी समिती नांदेडात येणार आहे.

अजूनही काही रुग्ण 'सिरीयस'

आता एकूण मृत्यूची संख्या ३१ झाली आहे, अजूनही काही रुग्ण सिरियस आहेत, आयसीयुमधील जास्त रुग्ण आहेत. त्यांची देखभाल केली जात आहे.

- डॉ. वाकोडे (अधिष्ठाता, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, नांदेड)

टॅग्स :Nandedनांदेडhospitalहॉस्पिटल