शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

नांदेड लोकसभा निवडणुकीत रिंगणातून दहा उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:42 IST

नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याला गुरुवारी प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी दहा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली ...

ठळक मुद्दे उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याला गुरुवारी प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी दहा उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. शुक्रवारी दुपारी ३ नंतर नांदेडलोकसभा निवडणूक आखाड्याचे चित्र स्पष्ट होणार आहे.लोकसभा निवडणुकीत २७ मार्च रोजी अर्जांची छाननी करण्यात आली. या छाननीत ५९ पैकी ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले.नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८७ अर्ज प्राप्त झाले असून ५५ अर्ज वैध ठरले असून चार अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी मागे घेण्यास २८ मार्च पासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी १० उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामध्ये अ. सल्फी अ. सलाम, महमद तौफीक महमद युसुफ, महमद सलीम महमद इकबाल, मोहम्मद वसीम मोहम्मद इकबाल, शफी शे. अमीर शेख, शेख असलम इब्राहीम, शेख इमरान शेख मस्तान, स. अलीमोद्दीन मोहीनोद्दीन, साहेबराव भीवा गजभारे आणि सुरेश दिगंबरराव कांबळे या उमेदवारांचा समावेश आहे.२९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. ५९ उमेदवारांपैकी चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. गुरुवारी १० उमेदवारांनी माघार घेतली. आता उर्वरीत ४५ उमेदवारांपैकी शुक्रवारी शेवटच्या दिवशी किती उमेदवार रिंगणात राहतील, याकडे लक्ष लागले आहे.नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ८७ अर्ज प्राप्त झाले असून ५५ अर्ज वैध ठरले असून चार अर्ज अवैध ठरले आहेत. १६- नांदेड लोकसभा निवडणूक २०१९ मतदारसंघासाठी २७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांच्या नियंत्रणाखाली उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात ८७ उमेदवाराच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात एकूण ५५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. वैध अर्जामध्ये अशोक शंकरराव चव्हाण - इंडियन नॅशनल काँगेस,. प्रतापराव गोविंदराव चिखलीकर - भारतीय जनता पार्टी, अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार - आंबेडकर नॅशनल काँग्रेस, अब्दुल समद अब्दुल करीम - समाजवादी पार्टी, अल्ताफ अहमद इक्बाल अहमद - इंडियन युनियन मुस्लिम लीग, अंकुशराव शिवाजीराव पाटील - राष्ट्रीय मराठा पार्टी, संभाजी वामनराव पाटील - क्रांतिकारी जय हिंद सेना, यशपाल नरसिंगराव भिंगे - वंचित बहुजन आघाडी, मोहन आनंदराव वाघमारे- बहुजन मुक्ती पार्टी, विजय भीमराव कांबळे - रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक), शिवानंद दत्तात्रय पांचाळ-बळीराजा पार्टी, शेख अफजलोद्दीन अजमोद्दीन- बहुजन महा पार्टी, श्रीकांत लक्ष्मणराव गायकवाड - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, अहमद अ. खादर नईम- अपक्ष, अरिफ अहमद शेख - अपक्ष, इक्बाल अहमद फकीर अहमद -अपक्ष, श्रीरंग उत्तमराव कदम अपक्ष, अशोक शंकरराव चव्हाण- अपक्ष, झुल्फेखान जिलानी सय्यद- अपक्ष, तुकाराम गणपत बिराजदार- अपक्ष, थोरात रवींद्र गणपतराव- अपक्ष, नवघरे आनंद पांडुरंग- अपक्ष, नविद युनूस खान अपक्ष, पठाण जफर अली खॉं- अपक्ष, प्रकाश विठ्ठलराव गुन्नर- अपक्ष, प्रमोदकुमार किशनराव कामठेकर अपक्ष, मनीष दत्तात्रय वडजे- अपक्ष, महेश प्रकाशराव तळेगावकर -अपक्ष , माधवराव संभाजी गायकवाड -अपक्ष, अ‍ॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील- अपक्ष, मो. मोहीजोद्दीन मो. वहिजोद्दीन -अपक्ष, रंजीत गंगाधरराव देशमुख -अपक्ष, राहुल सिताराम साळवे -अपक्ष, लता गौतम कांबळे -अपक्ष , लतीफ उल जफर कुरेशी- अपक्ष,लतीफखाँ पीरखाँ पठाण- अपक्ष, विजयमाला गजानन गायकवाड- अपक्ष, शफी शेख अमीर शेख- अपक्ष, शिवानंद अशोकराव देशमुख -अपक्ष, शेख मुनीर शेख युसूफ -अपक्ष, सचिन उत्तमराव नवघरे- अपक्ष, सय्यद तन्वीर सय्यद हमजा - अपक्ष, सय्यद मोईन सय्यद मुख्तार - अपक्ष, अ‍ॅड. सुभाष खेम्मा जाधव- अपक्ष, सुनील मनोहर सोनसळे- अपक्ष, यूसूफ नबी खान- अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे़ त्यामुळे रिंगणातून आणखी किती जण माघार घेतात याबाबत उत्सुकता आहे़चार उमेदवारांचे अर्ज ठरले अपात्रअमिता अशोकराव चव्हाण इंडियन नॅशनल कॉंग्रेस, धनाजीराव व्यंकटराव देशमुख-भारतीय जनता पार्टी, बापुराव विठ्ठलराव कल्याणकर-अपक्ष, बालाजी दिगंबरराव कोटगिरे-अपक्ष यांची नांदेड लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक -२०१९ छाननीअंती उमेदवार अपात्र ठरविण्यात आले आहेत.

टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाण