जिल्हा परिषद व यशदा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित आमचा गाव, आमचा विकास कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. शिंगणे, सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक पावडे यांची मंचावर उपस्थिती होती.
किशोरवयीन मुली, गरोदर माता व स्तनदा माता यांच्या सकस आहारासाठी क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. बालसंस्कार केंद्र म्हणून अंगणवाड्यांची ओळख निर्माण होताना अंगणवाडी आय.एस.ओ. करण्यासह मुलांसाठी प्ले ग्राऊंडची सुविधा निर्माण करावी. कुपोषण मुक्तीचा कार्यक्रम हाती घेऊन सर्व बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. विस्तार अधिकारी निलेश बंगाळे, सुधीर सोनवणे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. दरम्यान, शनिवारी या प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप होणार आहे.