शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Talathi Exam: जोडवे अन् मंगळसूत्र काढून या; शासनाचा फतवा की परीक्षा केंद्राची मनमानी?

By श्रीनिवास भोसले | Updated: August 21, 2023 19:35 IST

अनेक परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना नियमाच्या नावाखाली महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या आणि पायातील जोडवे काढायला लावले.

नांदेड : तलाठी परीक्षेत नाशिक, वाशिम जिल्ह्यांत हायटेक कॉपीचा प्रकार उघड झाला. त्यानंतर नियमावलीच्या नावाखाली महिला परीक्षार्थ्यांसाठी अजब फतवा काढण्यात आला. त्यामुळे चक्क सौभाग्यवती महिलांच्या पायातील जोडवे, हातातील बांगड्या अन् गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना सोमवारी परीक्षेला सामोरे जावे लागले. पहिल्याच श्रावण सोमवारी सौभाग्याचे अलंकार काढावे लागल्याने महिला परीक्षार्थ्यांनी या धोरणाचा निषेध नोंदविला.

अनेक वर्षांपासून शासनाकडून शासकीय कार्यालयांतील रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या लाखाच्या घरात पोहोचली. सध्या मेगा भरतीच्या नावाखाली शासनाकडून एका खासगी कंपनीच्या माध्यमातून तलाठी भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. परंतु, ही परीक्षा कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत आहे. नाशिक आणि वाशिम जिल्ह्यांत हायटेक कॉपीचा प्रकार उघड झाला. मायक्रोफोन, मायक्रो स्कॅनरचा केलेला वापर पाहून पोलिसही अवाक झाले होते. परंतु, अशा बोटावर मोजण्याएवढ्या परीक्षार्थ्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सामान्य, कष्ट करून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोमवारी नांदेड शहर व परिसरातील अनेक परीक्षा केंद्रांवर प्रवेश करताना नियमाच्या नावाखाली महिलांना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या आणि पायातील जोडवे काढायला लावले. पायातील जोडवे अन् हातातील काचेच्या बांगड्या निघत नव्हत्या. दुसरीकडे रिपोर्टिंग टाइम होत होता. अशा परिस्थितीत काही महिला परीक्षार्थ्यांनी अक्षरश: दगडाने बांगड्या फोडल्या तर पायातील जोडवे अडकित्त्यांनी तोडून काढले. परंतु, जोडवे अन् बांगड्या तोडून काढताना अनेक महिलांना अश्रू रोखता आले नाही. ऐन श्रावण सोमवारी महिलांना त्यांच्या सौभाग्याचे अलंकार काढून ठेवण्याची वेळ शासनाच्या या अजब फतव्यामुळे ओढावली.

नांदेड, अमरावती केंद्रांवर घडला प्रकारनांदेडसह अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जोडवे, बांगड्या अन् मंगळसूत्र काढून ठेवायला लावले. हा नियम शासनाने घालून दिला की केंद्रावरील यंत्रणेचा कारभार होता, हे कळायला मार्ग नाही. परंतु, तलाठी परीक्षेच्या अनुषंगाने दिलेल्या नियमावलीत कुठेच दागिने काढून ठेवण्याचा उल्लेख नाही. उलट धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी त्या-त्या धर्मातील पारंपरिक ड्रेस, दागिने घालणाऱ्या परीक्षार्थ्यांची वेगळी तपासणी करण्याच्या सूचना आहेत. काही परीक्षा केंद्रांवर जोडवे अन् गळ्यातील मंगळसूत्र, कानातील डोरले पांढऱ्या चिकटपटीने झाकून टाकले.

टॅग्स :Nandedनांदेडexamपरीक्षा