शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दलित वस्तीच्या कामांना तूर्त स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:34 IST

जिल्हा परिषद दलित वस्ती विकासाच्या ३९ कोटी ७४ लाख २५ हजार रुपये निधीच्या १ हजार ६५५ कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र मागणीप्रमाणे कामाचे वाटप न झाल्याने काही सदस्यांत नाराजी आहे. या नाराजीतूनच गुरुवारी सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यासमोर ठिय्या मांडला होता. अखेर सदर कामांना तूर्त स्थगिती देण्यात आली.

नांदेड : जिल्हा परिषद दलित वस्ती विकासाच्या ३९ कोटी ७४ लाख २५ हजार रुपये निधीच्या १ हजार ६५५ कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र मागणीप्रमाणे कामाचे वाटप न झाल्याने काही सदस्यांत नाराजी आहे. या नाराजीतूनच गुरुवारी सदस्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यासमोर ठिय्या मांडला होता. अखेर सदर कामांना तूर्त स्थगिती देण्यात आली.समाजकल्याण सभापती शीलाताई निखाते यांच्या पाठपुराव्यामुळे मागील काही दिवसांपासून रखडलेल्या दलित वस्ती विकासाच्या कामांना नुकतीच मंजुरी मिळाल्याने ग्रामीण भागातील रखडलेली अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीतील कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती. मात्र सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे कामे वाटप न झाल्याने संतप्त झालेल्या या सदस्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागात जावून अधिकाऱ्यांसमोर आपला राग व्यक्त केला.या सदस्यांनी अनेक वस्त्या जाणीवपूर्वक विकासकामांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत समाजकल्याण विभागातील फाईलींचा पंचनामा करण्याची मागणी लावून धरली. यावेळी या विभागासह इतर विभागांतील वरिष्ठ अधिकारीही जिल्हा परिषदेत हजर नव्हते. त्यानंतर उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यासह इतर सदस्यांनी आपला मोर्चा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे वळविला. सदर फाईलींचा पंचनामा करुन तशी पोच देण्याची मागणी या सदस्यांनी लावून धरली. यावरुन बराचवेळ वादावादीही झाली. अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिका-यांनी सदर मंजूर झालेल्या कामांना तूर्त स्थगिती देण्यात येत असल्याचे पत्र देत त्याची माहिती जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती गटविकास अधिकाºयांना पाठविण्याचे निर्देश दिले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या या आदेशात समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्या दूरध्वनी संदेशानुसार सदर कामांना स्थगिती देत असल्याचे आदेशामध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.कामांचे वाटप शासनाच्या निकषानुसारचया सर्व प्रकाराबाबत समाजकल्याण सभापती शीला निखाते यांच्याशी संपर्क साधला असता नवीन आराखड्यानुसार वंचित वस्त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ज्या ठिकाणी विकासकामे झालेली नाहीत, त्या भागाला शासन निर्देशानुसार प्राधान्य दिले आहे. सदस्यांकडून आलेली कामांची मागणी आणि उपलब्ध निधी यात मोठी तफावत आहे. त्यानंतरही सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. यात काही जण नाराज झाले असले तरी कामांचे नियमानुसारच वाटप केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद