शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

नांदेड जिल्ह्यातील सपोनि दिनेश सोनसकर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:55 IST

नांदेड : राज्यभर पसरलेल्या डमी रॅकेट नोकर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे आणि मुख्य आरोपीसोबत संगनमत करण्याच्या आरोपावरुन सपोनि दिनेश सोनसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ या प्रकरणात नांदेड न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोनसकर फरारच होते़ त्यांना शनिवारी विशेष तपास पथकाने अटक केली़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : राज्यभर पसरलेल्या डमी रॅकेट नोकर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे आणि मुख्य आरोपीसोबत संगनमत करण्याच्या आरोपावरुन सपोनि दिनेश सोनसकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता़ या प्रकरणात नांदेड न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सोनसकर फरारच होते़ त्यांना शनिवारी विशेष तपास पथकाने अटक केली़शासकीय नोकरीसाठीच्या परीक्षेत डमी परीक्षार्थी बसवून नोकरी देण्याचा हा प्रकार २०१५ पासून सुरु होता़ नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर साडेतीन ते वीस लाख रुपयापर्यंत रक्कम घेतली जात होती़ या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे आजपर्यंतच्या तपासात उघडकीस आले आहे़ मांडवीचे योगेश जाधव यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते़ आतापर्यंत या प्रकरणात दोनशेहून अधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ या प्रकरणात मुख्य आरोपी प्रबुद्ध मधुकर राठोड हा असून लातूरमधील अनेकांचा या प्रकरणात समावेश आहे़ दरम्यान, पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखेत आणि त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेत असलेल्या सपोनि दिनेश दिगंबर सोनसकर यांच्यावर भरती घोटाळ्यात पुरावे नष्ट करणे तसेच मुख्य आरोपीसोबत संगनमत करुन अपराधिक कट रचल्याच्या आरोपावरुन गुन्हा नोंदविण्यात आला होता़याबाबत सोनसकर यांनी नांदेड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता़ न्यायालयाने तो फेटाळल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून सोनसकर फरार होते़ औरंगाबाद खंडपीठात त्यांनी जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना पुढील तारीख दिली होती़ त्याचदरम्यान एसआयटीचे वरिष्ठ पोनि़ शंकर केंगार यांनी सोनसकर यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली़