शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

नवीन नांदेड परिसरात तरुणाची नैराश्यातून गळफास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:41 IST

नैराश्यातून एका २४ वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

नवीन नांदेड :  नैराश्यातून एका २४ वर्षीय तरूणाने बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज सकाळी आठ वाजेदरम्यान तुप्पा शिवारात निदर्शनास आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील तुप्पा पाटीजवळील शेतकरी कादरी यांच्या शेतातील बाभळीच्या झाडास १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान, एक तरूण कापडी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केला असल्याची माहिती तुप्पा येथील पोलिस पाटील शेख आजमोद्दीन यांना समजली. दरम्यान, शेख आजमोद्दीन यांनी उपरोल्लेखित घटनेची माहिती नांदेड ग्रामीण ठाण्यातील पोलीसांना दिली.

ही माहिती समजताच महिला पोउपनि. स्वाती कावळे, पोउपनि. सोनाली कदम, पो. हे. कॉ. रमाकांत कदम व पो. काॅ. तानाजी ठाकुर यांनी पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी, पोलिसांना घटनास्थळी असलेल्या एका दगडावर चुण्याने लिहीलेला मोबाइल क्रमांक निदर्शनास आला आहे.

नांदेड ग्रामीण पोलिसांनी दगडावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता, तो मयत तरुणाच्या मुंबईस्थित भावाचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या प्रेताची ओळख पटली असून, मयत तरुणाचे नाव यादव जयसिंग सोनकांबळे (रा. मंग्याळ, ता. मुखेड) असे असल्याची माहिती पोलिस ठाणे अंमलदार संजय रामदिनेवार यांनी दिली. उपरोल्लेखित पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ पंचनामा करून यादव सोनकांबळे यांचा  मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रूग्णालयात हलविले.

टॅग्स :Suicideआत्महत्याNandedनांदेडPoliceपोलिस