शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

राहेगावात सक्शन पंप जिलेटीनने उडविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 1:17 AM

गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाºयाविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअवैध वाळू उपसा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नांदेड तहसीलदारांची धाडसी कारवाई

अनुराग पोवळे।नांदेड : गोदावरी नदीतून कोणतीही परवानगी न घेता थेट सक्शन पंपाचा वापर करुन वाळू उपसा सुरू असल्याची बाब कळाल्यानंतर नांदेड तहसील प्रशासनाने अवैध वाळू उपसा करणारा सक्शन पंप जिलेटीन कांड्याच्या सहाय्याने उडवूनच टाकला. मराठवाड्यात अवैध वाळू उपसा करणाºयाविरुद्ध पहिलीच अशी बेधडक कारवाई करण्यात आली आहे.तालुक्यातील राहेगाव येथे गोदावरी नदीत सक्शन पंप टाकून वाळू उपसा केला जात होता. याबाबत नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांना तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीची शहानिशा करताना नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांच्यासह मंडळ अधिकारी, तहसीलदार २१ एप्रिल रोजी राहेगाव येथे पोहोचले. हे पथक गावात दाखल होताच गोदापात्र परिसरात सामसूम पसरली. राहेगाव येथे एक सक्शन पंप गोदावरी नदीत बसवलेला आढळला. या पंपाद्वारे वाळू उपसा करुन त्याची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. ही वाहतूक दिवसा न होता रात्री सुरू होती. गोदावरी काठावर वाळू उपसा करणाºया वाहनांसाठी धक्काही तयार करण्यात आला होता.नायब तहसीलदार काकडे यांनी सदर बाब नांदेडचे तहसीलदार किरण अंबेकर यांना कळविली. गोदावरी पात्रात सक्शन पंप असल्याची माहिती दिली. यावेळी सदर प्रकरणात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनाही सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यावेळी सदर ठिकाणी वापरण्यात येणारा सक्शन पंप नष्ट करण्याचे आदेश त्यांनी दिले. या आदेशानुसार तहसीलदार अंबेकर यांनी जिलेटीनच्या कांड्याने सदर पंप नष्ट करण्याचे आदेश दिले.या कारवाईदरम्यान स्वत: तहसीलदार अंबेकर हे घटनास्थळी पोहोचले. राहेगाव येथे पोलीस बंदोबस्तही बोलावण्यात आला होता. नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक श्रीमती कावळे यांच्यासह पो.ना. एस.ए. काळे आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.गोदावरी पात्रात असलेल्या सक्शन पंपावर जिलेटीन कांड्या लावण्यात आल्या. या कांड्यांचा स्फोट घडवत सदर सक्शन पंप पूर्णपणे नष्ट करण्यात आला. हा सक्शन पंप ताब्यात घेणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर होते. गोदावरी पात्रातून तो बाहेर काढणे, त्याची वाहतूक करणे या सर्व बाबींना फाटा देत तो नष्ट करण्याचाच निर्णय वाळूमाफियांचे कंबरडे मोडणारा ठरला. नांदेड तालुक्यात केवळ दोन ठिकाणी वाळू घाटांना परवानगी देण्यात आली आहे. त्या घाटांची प्रक्रिया सुरू आहे. अशी असताना महसूल यंत्रणा मागील महिनाभरापासून निवडणूक कामात गुंतल्याचे पाहून वाळू माफियांनी थेट सक्शन पंपानेच वाळू काढण्यास प्रारंभ केला होता. या ठिकाणाहून रात्री वाळू उपसली जात होती. याची वाहतूक दिवसा केली जात होती. दरम्यान, या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.ते फोन कोणाचे...राहेगाव येथे नांदेड तहसील कार्यालयाच्या पथकाने सक्शन पंप जप्त केल्याची कारवाई झाल्यानंतर या प्रकरणात तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना मोबाईलद्वारे अनोळखी नंबरवरुन मोबाईलद्वारे सदर प्रकरणाकडे कानाडोळा करावा, असे सांगण्यात येत होते. ते फोन नेमके कोणाचे होते, राहेगाव येथील वाळूमाफियांना कोणाचे पाठबळ होते, या बाबीचा पोलीस तपास करीत आहेत.

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा होणार नाहीअवैध वाळू उपसा सुरू असताना महसूल यंत्रणा कठोर कारवाई करणार हे राहेगावच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. वाळू माफियांना हा जणू इशाराच आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैध वाळू उपसा केला जाणार नाही. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आदेशित करण्यात आले आहे. विशेष पथकाकडूनही जिल्ह्यात कारवाई केली जाणार आहे़ कोणतीही परवानगी नसताना चक्क सक्शन पंपाच्या सहायाने वाळू उपसा करणे ही वाळू माफियांची मोठी मजल होती. वाळू माफियांना धडा शिकविण्यासाठीच राहेगावची कठोर कारवाई करण्यात आली.                            -अरुण डोंगरे, जिल्हाधिकारी, नांदेड.

गेल्या महिनाभरापासून महसूल यंत्रणा निवडणूक कामात गुंतली होती. याचाच फायदा घेत तालुक्यात काही ठिकाणी अवैध वाळू उपसा केला गेला. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. येत्या आठ दिवसांत तालुक्यात विशेष मोहीम राबवत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध राहेगावप्रमाणेच कठोर कारवाई करण्यात येणार आहे.             -किरण अंबेकर, तहसीलदार, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडsandवाळूBlastस्फोटNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड