शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थिनीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:01 IST

येथील समाजकल्याण शासकीय मुलींच्या वसतिगृहातील बारावी वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे व अभ्यास न झाल्यामुळे वसतिगृहातील खोलीमध्ये रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ठळक मुद्देहदगाव : बारावीचा अभ्यास न झाल्याचीही होती चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : येथील समाजकल्याण शासकीय मुलींच्या वसतिगृहातील बारावी वर्गात शिकणा-या विद्यार्थिनीने घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे व अभ्यास न झाल्यामुळे वसतिगृहातील खोलीमध्ये रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.मरडगा येथील करिश्मा किशनराव नरवाडे (वय १७) ही विद्यार्थिनी पंचशील विद्यालय हदगाव येथे शिक्षण घेत होती़ तिच्या वडिलांचा दहा वर्षांपूर्वीच मृत्यू झाला असून आई माहेरी राहते़ मामांनी तिचा सांभाळ केला़ इयत्ता आठवीपासून ती शिक्षणासाठी वेगवेगळ्या वसतिगृहामध्ये राहत असे़ शनिवारी करिश्मा आपल्या गावी मरडगा येथे गेली होती़ काका व काकीना बोलून आली़समाजकल्याण विभागाचे हदगाव येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहामध्ये ६ वी ते १२ वीपर्यंत १०० मुली राहतात़ दीड महिन्यापासून येथील वॉर्डनचे पद रिक्त आहे़ २६ जानेवारी रोजी आडे यांनी एक दिवसासाठी पदभार स्वीकारला होता़ दरम्यान, आ़ नागेश पाटील आष्टीकर यांनी समाजकल्याण आयुक्तांना या ठिकाणी वॉर्डन देण्याची मागणी केली होती़अंत्यविधी नवरीसारखा नटवून करावा..!बारावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून परीक्षेत मार्क कमी पडतील अशी भीती तिने मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये लिहिली आहे़ मला कोणाचाच आधार नाही़ मामाला माझ्यामुळे उगीच त्रास होतो़ त्यामुळे मी पुढे शिकूनही काय करू़ माझ्या लग्नाचा खर्च कोण करील, शिक्षणाचा खर्च कोण करील, असे प्रश्न तिच्या मनात येत असल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ करिश्माने आठ पानी चिठ्ठी लिहून ठेवली आहे़ त्यामध्ये माझा अंत्यविधी नवरीसारखा नटवून करावा़ माझे खूप स्वप्न होते;पण कोण पूर्ण करणार? असा प्रश्न तिने चिठ्ठीमध्ये विचारला आहे़ माझ्या मैत्रिणी खूप चांगल्या आहेत़ मामाही खूप चांगले आहेत़ कोणालाही जबाबदार ठरवू नये, असे लिहिले आहे.