शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

केदारगुडा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनी गर्भवती प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:38 IST

केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.

हदगाव : केदारगुडा आदिवासी निवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलगी साडेचार महिन्यांची गर्भवती राहिल्याचा गंभीर व खळबळजनक प्रकार घडूनही येथील मुख्याध्यापक आपला या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आहे. ती मुुलगी शाळेत नियमित येत नसल्याचा पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे.केदारगुडा येथे आदिवासी मुली-मुलांची शासकीय आश्रमशाळा आहे. मुलीसाठी अधीक्षिका असूनही मुलीचे मासिक पाळीचे रिपोर्ट त्यांनी निरंक दाखविले. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यातही शाळेत उपस्थित असल्याचे हजेरीपटावरुन सिद्ध झाले. तो पुरावाच ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. दर महिन्याला मुलीची तपासणी करण्याचा अधिकार अधीक्षिकांना आहे. मुलासाठी स्वतंत्र पुरुष अधीक्षक असतो. मुलीचे जेवण त्यांना स्वतंत्र पुरविण्याची जबाबदारी अधीक्षिकांची असते. त्यांनी दिलेल्या अहवालावर मुख्याध्यापकाची स्वाक्षरी असते. पीडित मुलगी डिसेंबर महिन्यात शाळेत उपस्थित होती. त्या महिन्याच्या तपासणीत तिचा अहवाल निरंक दिला. हा गंभीर प्रकार आहे. याउलट हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्याध्यापक ए. जे. झुंजारे यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पालकांची भेट घेऊन त्यांना झालेला प्रकार सांगितला व लग्नाचा उपायही सुचविला, असा आरोप आहे. आश्रमशाळेत मुलगी असताना शाळाबाह्य मुले शाळेत येतातच कसे, या प्रश्नाचे उत्तर मुख्याध्यापक देऊ शकत नाहीत. मुलगी शाळेत नियमित येत नसे व मासिक पाळीची तपासणी सहा महिन्याला एकदा होत असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगून अधीक्षिकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत.या गंभीर प्रकरणाच्या चौकशीसाठी पीओ आले नव्हते तर इतर चौकशीसाठी आल्याचे ते म्हणाले. पण इतर कोणत्या प्रकरणात तपास सुरु आहे, याचे उत्तर मुख्याध्यापकांनी दिले नाही. असा गंभीर प्रकार घडल्यानंतर मुलाला गंभीर शिक्षा असल्यामुुळे ते तत्काळ लग्न करुन स्वत:चा बचाव करुन घेतात. पुन्हा त्या मुलीला वाऱ्यावर सोडून देतात. असे प्रकार यापूर्वी याच शाळेत घडले आहेत. मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षक या प्रकरणात दोषी असून त्यांच्यावर प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.४मुलीचे लग्न १८ आणि २१ वर्षे झाल्याशिवाय मुलाचा विवाह करता येत नाही. तसा कायदाही आहे. याचाही विसर मुख्याध्यापकांना पडल्याचा दिसतो. या गंभीर प्रकरणामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होतात, याचाही विसर पडल्याचे दिसते. झालेला प्रकार गंभीर असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तामसा येथील आदिवासी बचाव संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी