शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड शहरात रामनवमीनिमित्त तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:24 IST

रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़

ठळक मुद्देअडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात

नांदेड : रामनवमीनिमित्त शहरातील गाडीपुरा भागातून शनिवारी दुपारी १२ वाजता शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यासाठी संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे़ या शोभायात्रेत महापुरुषांसह सैनिकांना समर्पित देखाव्यांचा समावेश राहणार आहे़ जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत़श्री रामनवमीनिमित्त दरवर्षी गाडीपुरा भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात येते़ त्यामुळे एक दिवसाकरिता वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे़ हबीब टॉकीज, जुना मोंढा, देना बँक, महावीर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, शिवाजीनगर, आयटीआय, श्रीनगर, वर्कशॉप कॉर्नर जाण्या-येण्यासाठी पूर्णपणे बंद राहील़ वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद चौकाकडे येणारा-जाणारा रस्ता बंद राहील़ सिडको, हडको, लोहा-सोनखेड ते जुना मोंढाकडे येणारा रस्ता जुना मोंढापासून बंद राहिल़ अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली गेट, चिखलवाडी ते महावीर चौकाकडे येणार रस्ता फॉरेस्ट आॅफीसपासून बंद राहील़ बाफना टी पॉर्इंट, कविता रेस्टॉरंट, भगतसिंघ चौक, मार्गे जुना मोंढाकडे येणारा रस्ता जुन्या मोंढापासून बंद राहील़ त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ बर्की चौकाकडून जुना मोंढ्याकडे येणारी वाहतूक महम्मद अली रोड हबीब टॉकीजपासून गणेश टॉकीज मार्ग रोडचा जाण्या-येण्यासाठी वापर करतील़ वजिराबाद चौकाकडून श्रीनगर वर्कशॉपकडे जाणारी वाहतूक तिरंगा चौक पोलीस मुख्यालय मार्ग खडकपुरा, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरतील़ राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राज कॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉर्इंट, अण्णा भाऊ साठे चौक, महाराणा प्रताप चौक या मार्गाचा वापर करतील़ गोवर्धनघाट पुलावरुन शहरात येणारी वाहतूक पोलीस मुख्यालय कॉर्नर, लालवाडी, खडकपुरा, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाणारा रस्ता वापरतील़ सिडको, हडको, लोहा-सोनखेडकडून येणारी वाहतूक साईकमान, गोवर्धनघाट, नवीन पूल, तिरंगा चौक, मुख्यालय कॉर्नर, लालवाडी अंडरब्रीज, शिवाजीनगर, पिवळी गिरणी, गणेशनगर वाय पॉर्इंटकडे जाण्या-येण्यासाठी वापरतील़

टॅग्स :NandedनांदेडNanded policeनांदेड पोलीसRam Navamiराम नवमी