शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जप्त वाळूसाठी ठेकेदारांची जोरदार फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 01:21 IST

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या ठेकेदारांमध्ये तहसील कार्यालयात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी अधिकाऱ्यांनी या सर्व ठेकेदारांना बाहेर बसवून शांत केले. नांदेड जिल्ह्यात ...

ठळक मुद्देउमरीत पाच हजारपेक्षाही अधिक ब्रास वाळूसाठा : शासकीय दर १२७६ वरुन २२०० रुपये प्रतिब्रास

बी.व्ही. चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कउमरी : तालुक्यातील गोदावरी नदी परिसरात अवैधरित्या जमा केलेल्या वाळूसाठ्यांचे लिलाव १५ रोजी होणार असून यासाठी अनेक ठेकेदारांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. वाळू लिलावात बोली लावण्याच्या पूर्वतयारीसाठी जमलेल्या ठेकेदारांमध्ये तहसील कार्यालयात यावरून चांगलीच खडाजंगी झाली.यावेळी अधिकाऱ्यांनी या सर्व ठेकेदारांना बाहेर बसवून शांत केले. नांदेड जिल्ह्यात केवळ उमरी तालुक्यात सहा वाळूघाट असून शासनाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात गोदावरी नदीतून वाळूचा उपसा करण्यात आला. गोदावरी नदीच्या परिसरात महाटी, येंडाळा, कौडगाव, शिंगणापूर, बिजेगाव, कावलगुडा, हस्सा आदी गावांच्या शिवारात या वाळूचे साठे करण्यात आले. उमरी तहसीलतर्फे या अवैधरित्या जमा केलेल्या वाळू साठ्यांची जप्ती करण्यात आली. सध्या उमरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या परिसरात सुमारे पाच हजार ब्रासपेक्षाही अधिक अवैधरित्या वाळूचे साठे आहेत. असे असले तरी सदरील वाळू साठा कमी प्रमाणात असल्याचे भासवून कमी पैशामध्ये या वाळूची बोली लावण्याचा घाट अनेकांनी रचला आहे. असे असले तरी प्रशासन याबाबत काय भूमिका घेते यावर बरेच अवलंबून आहे. यापूर्वीचा वाळूचा शासकीय दर १२७६ रुपये प्रतिब्रास याप्रमाणे होता. आता त्यात वाढ होऊन प्रतिब्रास २२०० रुपये एवढा झालेला आहे. येत्या आर्थिक वर्षात वाळू घाटांच्या लिलावा संदर्भात प्रक्रिया सुरू होत आहे. उमरी तालुक्यातील सर्व वाळूघाटांचे सर्वेक्षण झाले असून भूवैज्ञानिक खात्याच्यावतीने सर्वेक्षण झाले आहे. त्यांच्या अहवालानुसार आगामी लिलावासाठीचे वाळूघाट निश्चित केले जातील. त्यानुसार सर्व नियम व अटी यांचे पालन करून वाळू घाटांचा लिलाव होईल.अवैध वाळूचे चार टिप्पर पकडलेउमरी : येथील महसूल विभागातर्फे आज पहाटे वाळूमाफियांविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली असून बळेगाव येथे गोदावरी नदीपात्रातून गाढवांद्वारे जमा केलेली वाळू अवैधरित्या वाहतूक करताना चार टिप्पर पकडण्यात आले. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेश लांडगे, जी. एस. कोतलगावकर, मंडळ अधिकारी एस.बी.जाधव, एस.बी. बाचीपल्ले, तलाठी सोन्नर, हराळ, जाधव तसेच कोतवाल दिलीप यमेवार, राठोड आदींनी ही कारवाई केली. बळेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी महसूल विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १० आॅक्टोबर रोजी बुधवारी पहाटे पाच वाजेपासून बळेगाव येथील गोदावरी नदीपात्राशेजारी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पाळत ठेवली होती. यावेळी अचानक धाडी टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार टिप्पर पकडण्यात आले. महसूल विभागाने पकडलेल्या टिपरचे क्रमांक एमएच-२६-बीई , एमएच-२६ एडी- ३०५५ , एमएच-२० वाय-८३४१, एमएच-१६-जी-६५७९ याप्रमाणे आहेत.सदर वाहनांना नियमानुसार दंड आकारण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :Nandedनांदेडsandवाळू