शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘हनम्याच्या मरिआय’ने केला मनोरंजनातून अंधश्रद्धेवर प्रहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:13 IST

परळी वै़येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीने सादर केलेल्या ‘हनम्याची मरिआय’ या नाटकाने अंधश्रद्धेवर प्रहार केला़ याबरोबरच सकस अभिनयाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन करतानाच अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देण्याबाबत प्रबोधनही केले़

ठळक मुद्देहौशी मराठी नाट्यस्पर्धा मनोरंजनाबरोबरच केले प्रबोधन

नांदेड : परळी वै़येथील सर्वोदय शिक्षण कला अकादमीने सादर केलेल्या ‘हनम्याची मरिआय’ या नाटकाने अंधश्रद्धेवर प्रहार केला़ याबरोबरच सकस अभिनयाद्वारे उपस्थितांचे मनोरंजन करतानाच अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देण्याबाबत प्रबोधनही केले़महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी येथील कुसुम सभागृहात सुरु आहे़ परळीच्या सर्वोदय शिक्षण कला अकादमीने हे नाटक सादर केले़ विजय खानविलकर यांनी लिहिलेले हे नाटक अरुण सरवदे यांनी दिग्दर्शित केले़ नाटकाचा नायक पोतराज असलेला हनम्या (अरुण सरवदे) आणि त्याची पत्नी गौरी (सुवर्णा बुरांडे) यांच्याभोवती गुंफलेली ही कथा प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली़ परंपरागत चालत आलेल्या अनिष्ठ, रुढी परंपरांना छेद देवून प्रबोधन करतानाच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यातही हे नाटक कमालीचे यशस्वी ठरले़हनम्या आणि गौरीला बऱ्याच नवसानंतर मुलगा होतो़ या मुलाला चांगले शिक्षण देवून मोठा अधिकारी बनवायचे या दोघांचे स्वप्न असते़ परंतु, मरिआईची भीती दाखवून महाराज (संतोष कणसे) मुलाला पोतराज बनवायला सांगतो़ मरिआयचा जागर घालण्याची सूचनाही तो या दोघांना देतो़ भीतीपोटी हनम्या हे सारे करण्याचे मान्य करतो़ आणि त्यासाठी पैसा जमवू लागतो़ पै-पै जमविलेले पैसे चोरी जातात़ मात्र जागर तर घालायचा असतो़ मग हनम्या नसबंदीची शस्त्रक्रिया करुन पैसे जमवितो़ आणि जागर घालतो़ यातच त्याच्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू होतो़ या घटनेनंतर मात्र हनम्या आणि गौरीचा मरिआईवरुन विश्वास उडतो़ आणि अखेर ते दोघेही ही सर्व अंधश्रद्धा नाकारतात, पोतराजकी सोडतात़ प्रेक्षकांना सकारात्मक विचार करायला हे नाटक भाग पाडते़नाटकात सत्यम सरोदे यांनी बाब्याचे पात्र अतिशय सुरेखपणे साकारले आहे़ तर रेणुका शहाणे, आनंद कांबळे, परमेश्वर देवकते, सुधीर माले, पंकज गोरे, प्रदीप चोपणे, गणेश उदारे, गजानन चिंचोळे, तिलोत्तमा पतकराव, पंचफुला शितोळे यांनीही आपआपल्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत़ पूजा राठोड, आकांक्षा नवले, नंदीनी दहीभाते, आर्यन धपाटे, सुलभी बुरांडे, अदिती धपाटे या बालकलावंतांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या़ नैपथ्य सुरेश बुरांडे, प्रकाशयोजना गिरीष बिडवे, संगीत प्रकाश बोरगावकर, रंगभूषा गणराज सरवदे तर वेशभूषेची जबाबदारी सुनीता कणसे यांनी पार पाडली़आज ‘गावगुंडांचा विषारी विळखा’हौशी राज्य नाट्यस्पर्धेत शनिवारी बोरी (उस्मानाबाद) येथील निपॉन सोशल वेलफेर सोसायटीच्या वतीने पूजा राठोड लिखित आणि अभय राठोड दिग्दर्शित ‘गावगुंडांचा विषारी विळखा’ हे नाटक सादर होणार असल्याचे स्पर्धेचे समन्वयक दिनेश कवडे यांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडTheatreनाटक