शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

गावागावातून होणारी पाण्याची निर्यात थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 00:42 IST

निसर्ग व मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत कमी-जास्त प्रमाणात पाणी आहे़ गावागावातून या वस्तूंच्या माध्यमातन शहराला पाण्याची निर्यात होते़ हे पाणी आता गावातच थांबविण्याची आवश्यकता आहे़

ठळक मुद्देराज्यातील पहिल्या कार्यशाळेला नांदेडमध्ये प्रतिसाद

नांदेड : निसर्ग व मानवनिर्मित प्रत्येक गोष्टीत कमी-जास्त प्रमाणात पाणी आहे़ गावागावातून या वस्तूंच्या माध्यमातन शहराला पाण्याची निर्यात होते़ हे पाणी आता गावातच थांबविण्याची आवश्यकता आहे़ त्यासाठी आपआपले गाव जलसाक्षर करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचा संकल्प नांदेड येथे पार पडलेल्या पहिल्या जलसाक्षरता कार्यशाळेत करण्यात आला़जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन भवन येथे जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी आणि जलदूत यांच्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली़ जलसाक्षर समाज निर्मितीत जलव्यवस्थापन हाच पाणीटंचाईवर शाश्वत पर्याय आहे़ ही बाब जलत्ज्ज्ञांच्या लक्षात आल्याने राज्य शासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशात जलसाक्षरता केंद्राची स्थापना केली आहे़ या केंद्राच्या वतीने पहिली कार्यशाळा नांदेड येथे पार पडली़ या कार्यशाळेला जलयोद्धा विभागीय जलनायकासह १० जिल्हा जलनायक, १६० जलदूत आणि ३० जलकर्मींची उपस्थिती होती़ पहिल्या सत्रात जलक्षेत्रातील आव्हाने, जलव्यवस्थापनाची गरज, जलसाक्षरता म्हणजे काय, तसेच पाण्याचा ताळेबंद, संकल्पना, महत्त्व व पद्धत यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले़ लोकहिताचे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी जिल्हा प्रशासन असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यावेळी आवर्जून सांगितले़ यशदाच्या जलसाक्षरता केंद्राचे संचालक सुमंत पांडे आणि वाल्मी येथील जलसाक्षरता केंद्राचे संचालक डॉ़राजेश पुराणिक यांनी या कार्यशाळेत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़ पाण्याचा प्रत्येक थेंब नियोजनपूर्वक वापरला पाहिजे असे सुमंत पांडे म्हणाले़ आपला वर्तमानकाळ व भविष्यकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी भूपृष्ठ जलसाठ्याबरोबरच भूजलसाठ्यांचे देखील पुनर्भरण करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली़ तर डॉ़ पुराणिक यांनी पाण्याच्या वापरातून सर्व पातळीवरील लोकांचे समान पातळीत समृद्धी होणे म्हणजेच शाश्वत जलव्यवस्थापन असल्याचे सांगितले़ कार्यशाळेला जलसाक्षरता समितीचे सचिव एम़ एम़ कहाळेकर, जलतज्ज्ञ प्रा़डॉ़ परमेश्वर पौळ, प्रा़डॉ़बालाजी कोंपलवार, जलनायक दीपक मोरताळे, पाणी फाऊंडेशनचे प्रतिनिधी इंद्रजीत पाटील, नागदरवाडीचे जलनायक बाबुराव केंद्रे, शेंबोली गावचे सरपंच जलनायक बाळासाहेब देशमुख, संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख आदींनीही मार्गदर्शन केले़ सूत्रसंचालन अपर्णा सावळे व राजेश होनुले यांनी केले. आभार कैैलास येसगे, प्रा़डॉ़राजेश कोटलवार, निवृत्ती जोगपेठे यांनी मानले़ कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रमेश कदम, रमीजराज अल्लाखान, उज्ज्वला होटकर, नाजिया सौदागर, स्वप्निल शिंदे आदींनी परिश्रम घेतले.टंचाईवर जलव्यवस्थापन हाच पर्यायपाणीटंचाईचे चटके आत गाववाड्यापासून महानगरांना सोसावे लागत आहेत़ या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनासाठी मानव जलसाक्षर असणे आवश्यक आहे़ जलसाक्षर समाज निर्मितीत जलव्यवस्थापन हाच पाणीटंचाईवर शाश्वत पर्याय असल्याने जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून जनजागृती सुरू करण्यात आली आहे़ आपल्या वाट्यास आलेले पाणी मर्यादित आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेवून उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे़ याबाबतची माहिती तसेच प्रबोधन या जलसाक्षरता केंद्राच्या वतीने करण्यात येणार असल्याचे यावेळी तज्ज्ञांनी सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater transportजलवाहतूक