शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जाधवांच्या माघारीने पायावर धोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:42 IST

लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देराजकीय वर्तुळात चर्चेला तोंड अनुभवशून्यतेमुळे सेनेत घेतले जाताहेत उफराटे निर्णय

हिंगोली : लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराची राळ उठण्यास सुरुवात होत आहे. कालपर्यंत नफा-तोट्याची गणिते मांडणाऱ्यांनी भावनिकतेच्या लाटेवरच अ‍ॅड.शिवाजी जाधव यांना माघार घेण्यास भाग पाडल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा सेनेलाच जास्त फटका बसणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले सुभाष वानखेडे हे मागच्या वेळी सेनेकडून या मतदारसंघात लोकसभा लढले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील मंडळींनीच बंड पुकारले होते. वसमत व कळमनुरी विधानसभा मतदारसंघात दगाफटका झाला होता. वानखेडे यांचे आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा व माजी आ. गजानन घुगे यांच्याशी बिनसलेले असल्याने हा प्रकार घडला होता. लोकसभा संपली. वानखेडे पडले. मात्र या दोन्ही मतदारसंघातील वानखेडे समर्थक कमालीचे नाराज होते. विधानसभेला ते सेनेचे काम करायचे नाही, या तयारीत होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत घुगे व मुंदडा यांना तिकीट जाहीर झाले अन् वानखेडे यांनी भाजपला जवळ केले. वानखेडे समर्थकांनीही मग वसमतमध्ये भाजपच्या तंबूत जागा मिळविली. त्यात थोडेबहुत राष्ट्रवादीवर नाराज असलेलेही घुसले. परिणामी, जाधव यांनी ५0 हजारांपर्यंत मते मिळविली होती. भाजप स्वतंत्र लढण्याची चिन्हे असल्याने या मंडळीनेच जाधव यांना लोकसभेसाठी तयार केले. कुठेच उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणूनही तयारी केली. सेनेमुळे तेथेही माघार घ्यावी लागली. आता ही मंडळी सेनेसोबत जायचे कसे? असा विचार करीत आहे. तर वानखेडेही काँग्रेसकडून रिंगणात आहेत. त्यामुळे ते वानखेडे यांच्याच पदरात माप टाकतील, ही मोठी शक्यता आहे. नांदेडच्या हेमंत पाटील यांच्याशी जुळण्यापेक्षा त्यांना पूर्वीचे नेतृत्व असलेल्या वानखेडे यांच्याशी जुळण्यासाठी जास्त वाव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.वसमत वगळता इतरत्र मात्र जाधव यांच्यामुळे सेनेपेक्षा काँग्रेसलाच खूप जास्त सुरुंग लागण्याची चिन्हे होती. खरेतर काँग्रेसनेच जाधव यांची जास्त चिंता करणे अपेक्षित होते. मात्र सेनेने त्यांना माघार घेण्यासाठी मनधरणी केली. जाधव यांच्या नावाची झालेली चर्चा व त्यांनी चालविलेली तयारी पाहता त्यांनी बाहेरही चांगली मते मिळविली असती. त्यात काँग्रेसची मोठी गोची होण्याची भीती होती. शिवाय काँग्रेसचे काही नाराजही गळाला लागले असते. मात्र हा काँग्रेसला बसणारा फटकाही वाचला. त्यामुळे जाधव यांच्या माघारीमुळे एकप्रकारे सेनेने स्वत:च पायावर धोंडा पाडून घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.बाहेरचा उमेदवार : माहिती नसल्याचा परिणामआ.हेमंत पाटील हे नांदेडचे आमदार असल्याने त्यांना हिंगोली जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीविषयी फारशी माहिती असणे अभिप्रेतच नाही. एकतर त्यांनी थेट उमेदवारीवर दावा करायलाच हजेरी लावली अन् उमेदवारी जाहीर झाल्यावरच पहिल्यांदा राजकीय दौरा केला. त्यामुळे जाधव यांच्यामुळे फायदा की तोटा? याचे गणित त्यांना कळाले नाही. आ. डॉ.मुंदडा यांच्या अनुभवी नजरेतून पाहिले असते तर हे कळाले असते. मात्र तेही बाहेर असल्याने इतर कुणी गांभीर्य दाखविले नाही.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण