शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

कुस्त्यांसह रंगणार राजकीय जुगलबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:18 IST

सलग तीन दिवसांची मिळालेली सुटी त्यातच कडाक्याच्या थंडीपासून मिळालेला काहीसा दिलासा यामुळे माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे़

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माळेगाव यात्राभाविकांची मांदियाळी, भाजप व राष्ट्रवादीचे आज मेळावे

नांदेड : सलग तीन दिवसांची मिळालेली सुटी त्यातच कडाक्याच्या थंडीपासून मिळालेला काहीसा दिलासा यामुळे माळेगाव यात्रेत भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे़ त्यातच उद्या रविवारी कुस्त्यांची प्रचंड दंगल आयोजित करण्यात आली आहे़ तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मेळावे होणार असल्याने रंगणाºया राजकीय फडाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़कडाक्याच्या थंडीत यंदा माळेगाव यात्रेचा रंग भरला आहे़ राज्याच्या कानाकोपºयातून यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक माळेगावमध्ये दाखल झाले आहेत़ पहिल्याच दिवशी पार पडलेल्या शासकीय पूजेसह देवस्वारीपूजन आणि पालखी पूजनालाही भाविकांची मोठी उपस्थिती होती़ त्यानंतर झालेल्या ग्रामीण महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला़ यात्रेचे वैशिष्ट्य असलेले कृषीप्रदर्शन शुक्रवारपासून सुरु झाले़ या प्रदर्शनाला लाखो भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावून विविध स्टॉलची पाहणी केली़शनिवारचा दिवसही भरगच्च कार्यक्रमांचा राहिला़ सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली व समाजकल्याण सभापती शीलाताई निखाते यांच्या हस्ते विविध स्पर्धांचे उद्घाटन झाले़ या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला़ त्याचवेळी पशु, अश्व, श्वान व कुक्कुटप्रदर्शन भरविले़ या प्रदर्शनात वेगवेगळ्या जातीचे पशु-पक्षी पहायला मिळाले़दरम्यान, रविवारी सुटीच्या निमित्ताने सहकुटुंब माळेगावला येणा-या भाविकांची संख्या वाढणार आहे़ जिल्हा परिषदेच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे़ शिक्षण सभापती माधवराव मिसाळे यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे़ केवळ मराठवाड्यातीलच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपºयातून नामवंत मल्ल या फडात आपला जोर आजमावणार असल्याने या दंगलीबाबत उत्सुकता आहे़शुक्रवारी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने यात्रास्थळी ओबीसी सत्ता संपादन मेळावा पार पडला़ त्यानंतर रविवारचा दिवस राजकीय जुगलबंदीचाही ठरणार आहे़ रविवारी भाजपाच्या वतीने ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत धनगर आरक्षण जागर मेळावा होणार आहे़ तर राष्ट्रवादीच्या वतीने युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर यांच्या पुढाकाराने धनगर आरक्षण ललकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या दिग्गज आमदारांसह पदाधिकाºयांची उपस्थिती राहणार आहे़महिला बचत गटांचा खास खाद्यपदार्थ महोत्सव

  • महिला बचत गटांना प्रोत्साहित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद फुड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
  • या खाद्यपदार्थ महामेळाव्यात जिल्ह्यातून विविध महिला बचत गटांचे ८५ स्टॉल दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन स्टॉल महिला बालकल्याण विभागाचे असून ३७ स्टॉल हे खाद्यपदार्थांचे आहेत तर ४६ स्टॉल महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी आले आहेत.
  • खाद्यपदार्थ महोत्सवात बेसन भाकरी, पुरीभाजी, भाजीपोळी, खिचडी, भजे, व्हेज, नॉनव्हेजचे विविध खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. पहिल्यांदाच माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • माळेगाव यात्रेत सहभागी भाविक, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी या महोत्सवात भेट देऊन महिला बचत गटांनी तयार कलेल्या खाद्यपदार्थांचा आनंद घेतला. येत्या ८ जानेवारीपर्यंत माळेगाव यात्रेत खाद्यपदार्थ महोत्सव सुरु राहणार असून यात्रेकरुंनी महिला बचत गटांच्या या महोत्सवास भेट देऊन विविध खाद्यपदार्थांचा अस्वाद घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे़
टॅग्स :NandedनांदेडReligious programmeधार्मिक कार्यक्रमNanded zpनांदेड जिल्हा परिषद