शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

जलशुद्धीकरण केंद्रांच्या स्वच्छतेला झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:58 IST

शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.

ठळक मुद्देमहापालिका : तीन वर्षानंतर केली जाते स्वच्छता

नांदेड : शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता महापालिकेने हाती घेतली असून दर दोन ते तीन वर्षाला या शुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जातो.शहरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ५ जलशुद्धीकरण केंद्र आहेत. या शुद्धीकरण केंद्रात गोदावरी नदी तसेच सांगवी बंधाऱ्यातून पाणी घेतले जाते. या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन पाणी शहरातील विविध भागांत असलेल्या जलकुंभात पुरवठा केला जातो. त्यानंतर विविध भागात हे पाणी पिण्यासाठी पुरवले जाते. शहरात काबरानगर येथे दोन जलशुद्धीकरण केंद्र आहेत. त्यामध्ये एक ६० दशलक्ष लिटर आणि दुसरे शुद्धीकरण केंद्र हे ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे आहे. दक्षिण नांदेडला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी असदवन येथेही ३५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. सिडको येथेच १२.०६ दशलक्ष लिटर क्षमतेचे केंद्र आहे. तसेच नवीन डंकीन पंपहाऊस येथेही २७ दशलक्ष लिटर क्षमतेच्या केंद्रातून पाणी शुद्ध करुन शहराला पुरवले जाते.या जलशुद्धीकरण केंद्रामधील गाळ काढण्याचे काम महापालिकेने ७ फेब्रुवारीपासून हाती घेतले आहे. जवळपास फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पूर आल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रात येणारा गाळ मोठ्या प्रमाणात साचला जातो. हा गाळ काढून जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने चालावे यासाठी दर दोन ते तीन वर्षांनी हा गाळ काढला जातो, अशी माहिती उपअभियंता संघरत्न सोनसळे यांनी दिली. जवळपास १० लाख रुपये या कामासाठी खर्च केले जाणार आहेत.शहरातील जलशुद्धीकरण केंद्राच्या स्वच्छता कामामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या स्वच्छतेदरम्यान पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठा विभागाने केली आहे.दरम्यान, आयुक्त लहुराज माळी यांनी शहरातील पंपगृहाच्या पाहणीदरम्यान पाणीपुरवठा विभागाला अनेक सूचना केल्या आहेत. असदवनकडे जाणा-या जलवाहिनीची गळती सुरू आहे. ती तत्काळ रोखावी, अशी सूचना त्यांनी केली.शहरालगतच्या हातपंपांचीही दुरुस्ती करण्याचे निर्देशशहरात असलेल्या हातपंप आणि पॉवरपंप दुरुस्तीचे आदेशही देण्यात आले आहेत. ७१० हातपंपांपैकी दक्षिण नांदेडातील १९८ आणि उत्तर नांदेडातील ७२ हातपंपांच्या दुरुस्तीचे आदेश पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाWaterपाणी