शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

स्थायीने सुचविल्या ४६ सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:34 IST

नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़

ठळक मुद्देअर्थसंकल्पीय सभा : महापालिकेच्या उत्पन्नवाढीवरही सदस्यांच्या सूचना

नांदेड : नांदेड - वाघाळा शहर महापालिकेच्या स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्थायी समितीने बजेटमध्ये तब्बल ४६ सुधारणा नमूद केल्या आहेत़ त्यामध्ये महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याबरोबरच विविध विकासकामांचा समावेश आहे़ परंतु अगोदरच मनपाच्या तिजोरीत खडखडाट असताना स्थायीने सुचविलेल्या नवीन कामांच्या बाबतीत प्रशासन काय निर्णय घेते हेही महत्त्वाचे आहे़प्रशासनाने स्थायी समितीकडे बजेट सोपविल्यानंतर स्थायीच्या सदस्यांनी त्यावर दोन दिवस अभ्यास करुन सुधारणांची यादी प्रशासनाला सुपूर्द केली़ त्यात गुंठेवारी योजना पुन्हा सुरु करणे, पाणीपुरवठा, ड्रेनेज व मालमत्ता विभागाची अभय योजना सुरु करणे, मनपा हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी मालमत्ता मनपा रेकॉर्डवर आणून कर वसुली करणे, नगररचना विभागाच्या कामकाजात गती आणणे, नंदीग्राम मार्केट, महात्मा फुले मार्केट, राजीव गांधी मार्केटचे पुननिर्मिती करणे, मनपाच्या इतर मोक्याच्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणे या उत्पन्नवाढीसाठीच्या सुधारणा त्यात नमूद करण्यात आल्या आहेत़शहरवासीयांसाठी नवीन उपक्रमामध्ये गुरुनानकजी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा पुरविणे व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, मनपा वर्धापन दिनानिमित्त कविसंमेलन, श्रीमघाट परिसर किंवा इतर ठिकाणी तथागत गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर व वसंतराव नाईक यांचे पुतळे उभारणाऱ शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने ट्रक टर्मिनल प्रकल्पाला चालना देणे़ स्मशानभूमी आणि कब्रस्तानमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करणे़ मनपा मालकीच्या भूखंडांना वायर फिनिशिंग करुन फलक लावणे़ जीवनगौरव पुरस्काराची यावर्षीपासून सुरुवात करण्यात येणार आहे़ आऱ के़ लक्ष्मण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मध्यभागी कॉमन मॅनचा पुतळा उभारण्यात येणार आहे़ महापौर, आयुक्त व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वाढीव विकास योजनेत जागा आरक्षित करुन विकसित करण्यात येणार आहे़ मनपा रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत़अशाप्रकारे ४६ नवीन कामे स्थायी समितीने आज सुचविली़ यातील किती प्रस्तावावर प्रशासन सहमती दर्शविते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे़

  • आंतरराष्ट्रीय मानकानुसार श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमची खेळपट्टी व मैदान मनपा निधीतून विकसित करण्यात आले आहे़ यावर्षी पव्हेलियन, प्रेक्षक गॅलरी व इतर सुविधांकरिता नवीन डीपीआरनुसार १२० कोटी लागणार आहेत़ ते शासनाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे़ तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम निर्माण करण्यात येणार आहे़ चौकांचे विद्रूपीकरण झाले असून त्यासाठी चौक दत्तक योजना राबविण्यात येणार आहे़ शहराच्या सौंदर्यासाठी बँका, सहकारी संस्था, दानशूर नागरिकांचा त्यात सहभाग घेतला जाणार आहे़
टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाBudgetअर्थसंकल्प