शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike: 'शासनाने वडिलांचा बळी घेतला'; नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 13:57 IST

आंदोलन स्थळी गुरुवारी दुपारी दिलीप वीर अचानक बेशुद्ध झाले होते.

नांदेड- महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु आंदोलनात (ST Strike ) सामील असलेल्या नांदेडमधील एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय. दिलीप वीर असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला (ST employee dies while undergoing treatment in Nanded). दरम्यान, निलंबनाची कारवाई होणार म्हणून वडील सतत तणावात होते, त्यांचा बळी या सरकारनेच घेतला, असे म्हणत मृत वीर यांच्या मुलाने टाहो फोडला.

नांदेडच्या मध्यवर्ती आगारात सुरू असलेल्या आंदोलनात एसटी कर्मचारी दिलीप वीर हे सामील होते. काल दुपारी अचानक ते बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी केल्यानंतर उच्च रक्तदाबामुळे त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे स्पष्ट झाले. खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचारा सुरु होते. दरम्यान, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वीर यांच्या मृत्यूची माहिती मिळताच कर्मचारी संतापले आहेत. यामुळे नांदेडमधील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

५० लाखांची मदत द्यावी दरम्यान, संपात सहभागी असताना वडील सतत बैचैन होते. आज न उद्या न्याय मिळेल असे आम्ही त्यांना सतत सांगत. मात्र, ते झोपेतून मध्येच उठत, संपाचे व्हिडीओ पाहत. सरकार निलंबनाची कारवाई करत आहे. यामुळे ते अधिक तणावात होते. त्यांचा बळी राज्य सरकारनेच घेतला, असा आरोप मृत कर्मचारी वीर यांच्या मुलाने केला आहे. तसेच शासनाने मागणी मान्य केली नाही. यामुळे आंदोलनात सहभागी दिलीप वीर यांचा मानसिक तणावातून  मृत्यू झाल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे. तसेच कर्मचारी दिलीप वीर यांच्या कुटुंबियांना शासनाने तातडीने ५० लाखांची मदत द्यावी अशी मागणी आंदोलक एसटी कर्मचारी संघटनांनी केली आहे. 

टॅग्स :ST Strikeएसटी संपNandedनांदेडDeathमृत्यू