शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

SSC Result: नांदेडमध्ये दहावीच्या निकालाचा टक्का वाढला; जिल्ह्याचा ९३.९९ टक्के निकाल

By प्रसाद आर्वीकर | Updated: May 27, 2024 16:08 IST

दहावीच्या निकालात मुलींच आघाडीवर आहेत

नांदेड : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, नांदेड जिल्ह्याचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. लातूर विभागात नांदेड जिल्हा तिसऱ्या स्थानावर आहे. गतवर्षी दहावीचा निकाल ९०.३९ टक्के लागला होता. यावर्षी ३.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातून यावर्षी ४५ हजार ६१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५ हजार ६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ४२ हजार ३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील १७ हजार ८१२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १३ हजार ६४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८३९० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि २५११ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. १४९ विद्यार्थ्यांनी खासगी पद्धतीने परीक्षा दिली होती. त्यापैकी १२१ विद्यार्थी (८१.२० टक्के) उत्तीर्ण झाले. तर ७७७ विद्यार्थ्यांनी फेर परीक्षा दिली होती. त्यापैकी ४५६ विद्यार्थी (५८.६८ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

निकालात मुखेड तालुका आघाडीवरदहावीच्या निकालात जिल्ह्यात मुखेड तालुका आघाडीवर आहे. या तालुक्याचा ९८.४० टक्के एवढा सर्वाधिक निकाल लागला आहे. बिलोली तालुक्याचा ९६.६० टक्के, नायगाव तालुक्याचा ९६.५७ टक्के, कंधार तालुक्याचा ९६.४८ टक्के, लोहा ९५.७८ टक्के, अर्धापूर ९५.३१ टक्के, देगलूर ९४.८८ टक्के, उमरी ९३.७६ टक्के, धर्माबाद ९३.४२ टक्के, किनवट ९२.३७ टक्के, भोकर ९२.३० टक्के, नांदेड ९३.२० टक्के, हदगाव ९०.९८ टक्के, मुदखेड ९०.५१ टक्के, माहूर ८७.५६ टक्के आणि हिमायतनगर तालुक्याचा ८६.८५ टक्के निकाल लागला आहे.

दहावीतही मुलींची बाजीबारावी परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात २१ हजार ५०२ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार २८३ मुलींनी परीक्षा दिली. २० हजार ४३४ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.०१ टक्के आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.१८ टक्के एवढे आहे. मुलींनी यावर्षीही निकालात बाजी मारली आहे.

१९७ शाळांचा निकाल १०० टक्केजिल्ह्यातील १६ तालुक्यांतील एकूण शाळांपैकी १९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर कंधार तालुक्यातील झेड.पी. हायस्कूल या एकमेव शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.या शाळेतून दहावी परीक्षेसाठी एका विद्यार्थ्याने अर्ज केला होता. मात्र त्यानेही परीक्षा दिली नाही. परिणामी शाळेचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालNandedनांदेड