रद्द करण्यात आलेल्या गाड्यामध्ये गाडी संख्या (०७६२०) औरंगाबादनांदेड ही गाडी ७ जून ते १४ जून या कालावधीत रद्द करण्यात आली आहे, तसेच गाडी संख्या ०७६१९ नांदेड ते औरंगाबाद४ जून ते ११ जून, गाडी संख्या ०७४०९ आदिलाबाद ते नांदेड१ जून ते १५ जून, ०७४१० नांदेड -आदिलाबाद१ जून ते १५ जून, गाडी संख्या ०७००२ सिकंदराबाद ते श्री साईनगर शिर्डी४ जून ते १३ जून, श्रीसाईनगर शिर्डी ते सिकंदराबाद५ जून ते १४ जून, ०७६२१ औरंगाबाद रेणीगुंठा ही गाडी ४ जून ते ११ जून, गाडीसंख्या ०७६२२ रेणीगुंठा ते औरंगाबाद५ जून ते १२ जून, गाडीसंख्या ०७६६५ परभणी- नांदेड ही गाडी ३ ते १७ जून या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत. ०७६९१ नांदेड तांदूरपर्यंत १ जून ते १५ जूनपर्यंत,सिकंदराबाद ते तांदूरदरम्यान रद्द, तसेच ०७६९२ तांदूर ते परभणी २ ते १६ जून कालावधी तांदूर ते सिकंदराबाद आणि नांदेड ते परभणीदरम्यान रद्द करण्यात आली आहे.