लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.दलित वस्ती निधीतील महापालिकेने सुचवलेली कामे रद्द करुन नवीन कामे समाविष्ट करण्याच्या पालकमंत्र्यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला. प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारीही दर्शविली. या विषयावर सोमवारी नांदेड दौºयावर आलेल्या पालकमंत्री रामदास कदम यांची प्रतिक्रिया घेतली असता, दलित वस्ती निधीच्या कामांना मंजुरी देताना दलित वस्तीमध्येच ही कामे व्हावीत, यासाठी प्राधान्य दिले आहे. यापूर्वी दलित वस्ती निधीतून इतर ठिकाणची कामे सुचवण्यात आली होती. त्यामुळे हा निधी परत गेला होता. पुन्हा तो परत जावा, अशी आपली इच्छा नाही. त्याचवेळी महापालिकेच्या एकाही सदस्याचा प्रस्ताव आपल्याकडे आला नाही. सदस्यांनी कामेही सुचवले नाहीत.महापालिकेने ठराव घ्यायचा आणि कामांची यादी पालकमंत्र्यांकडे द्यायची आणि पालकमंत्र्यांनी त्याला मंजुरी द्यायची असे होत नाही. पालकमंत्र्यांनाही अधिकार आहेत. त्या अधिकारांचा आपण वापर केला आहे. या विषयात कोणाला न्यायालयाला जायचे असेल तर त्यांनी लवकर जावे, असा सल्लाही दिला.२०१७-१८ वर्षामध्ये सुचवलेल्या १५ कोटींच्या कामात सर्व कामे दलित वस्ती मधीलच आहेत की नाही? ही बाब तपासण्याचे आदेशही त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना दिले. महापालिकेने सुचवलेली कामेच मंजूर करावी, हा प्रकार चोरांच्या उलट्या बोंबा, असाच आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकाºयांनी अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.आ. हेमंत पाटील परदेशात..!पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या १७ कामामध्ये नवीन नांदेडातील जवळपास पावनेतीन कोटींच्या कामाचा समावेश आहे तर पालकमंत्र्यांनी सुचवलेले नवीन १७ कामे ही उत्तर मतदार संघातच आहेत. याबाबत पालकमंत्र्यांनी दक्षिण-उत्तर ही बाब मी लक्षात घेतली नाही. दलित वस्तीतील कामे केवळ योग्य ठिकाणी व्हावे, या दृष्टीने निर्णय घेतला आहे. दक्षिण मतदार संघातील कामे रद्द झाले असतील तर आ. हेमंत पाटीलांनी नाराज व्हायचे काहीही कारण नाही. ते सुचवतील तेच आपण करत आहोत, असेही पालकमंत्री कदम म्हणाले. आज ते परदेशात असल्यामुळे बैठकीला उपस्थित नसल्याचा खुलासाही केला.
... तर पालकमंत्र्यांचे कामच काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:47 IST
महापालिकेने कामे सुचवायची, प्रस्ताप पाठवायचा अन् ती पालकमंत्र्यांनी मंजूर करायची, असे असेल तर पालकमंत्र्यांचे कामच काय? असा प्रतिप्रश्न करीत पालकमंत्री रामदास कदम यांनी दलित वस्ती निधी नियोजनातील आपली भूमिका योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
... तर पालकमंत्र्यांचे कामच काय?
ठळक मुद्देरामदास कदम: कामे अंतिम करण्याचा निर्णय माझाच