प्रवासासाठी तीच ती कारणे
या प्रवासासाठी येणारे प्रवासीही आरोग्याशी निगडित बाबीसंदर्भातच प्रवास करू इच्छितात. यातील अनेकजणांना दवाखान्यात जायचे असते तर काहींना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नातेवाइकाच्या मदतीसाठी जायचे असते, तर काहींना अंत्यसंस्कारासाठी जायचे असते.
अधिकाऱ्यांबरोबर उडतात खटके
कोरोना प्रादुर्भावाचा फटका एसटीला बसला आहे. त्यामुळे गरजेनुसार मोजक्या गाड्या सोडल्या जात आहेत. मात्र, काही प्रवासी अमुक गावाला गाडी कधी सोडणार? अशी विचारणा करीत अधिकाऱ्यांबरोबर वाद करीत असल्याचे दिसते. चार-दोन प्रवाशांसाठी गाडी कशी सोडणार? असा या अधिकाऱ्यांचा प्रतिप्रश्न असतो.
लांब पल्ल्याच्या गाड्या बंदच
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या मोजक्या गाड्या सुरू आहेत. कोरोना प्रादुर्भाव आणि त्यात रोडावलेली प्रवाशांची संख्या यामुळेच लांब पल्ल्याच्या गाड्या बहुतांश बंद आहेत. सध्या केवळ शेजारच्या लातूर, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांत मोजक्या गाड्या सोडल्या जात आहेत.
कोट--------------
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यानुषंगाने राज्य शासनाने लागू केलेला लॉकडाऊन याचा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. या काळात काही मोजक्या गाड्या सुरू आहेत. या गाड्या गरजेनुसार सोडल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे.
जिल्ह्यातील एकूण आगार १६
सुरू असलेल्या बसेसची संख्या ४०
प्रवास करणाऱ्यांची संख्या ८५०