शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वरचे पाणी विष्णूपुरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:28 IST

शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.

ठळक मुद्देमहापालिका : नांदेडची तहान भागविण्यासाठी पाण्याची मागणी, कॅनॉलद्वारे ६० किलोमीटर अंतराहून येत आहे पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेतलेले १० दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात येण्यास प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांत जवळपास १ दलघमी पाणी पोहोचले असून कॅनॉलद्वारे पाणी घेण्यात येत असल्याने संथगतीने पोहोचत आहे.नांदेड शहरासाठी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या सिद्धेश्वर प्रकल्पात १० दलघमी पाणी राखीव ठेवण्यात आले होते. नांदेड शहरासाठीच्या पाण्याची उपलब्धता लक्षात घेता १५ एप्रिलपासून सिद्धेश्वर प्रकल्पातून १० दलघमी पाणी घेण्यास प्रारंभ झाला आहे. हे पाणी १८ एप्रिल रोजी विष्णूपुरी प्रकल्पात दाखल झाले आहे. सिद्धेश्वर, पूर्णा, वसमत, तळणी, नाळेश्वरपर्यंत जवळपास ६० किलोमीटर अंतराहून पाणी कॅनॉलद्वारे आणले जात आहे. नाळेश्वरहून नाल्यामार्गे गोदावरी नदीत पाणी घेतले जात आहे. हे पाणी १५ एप्रिलपासून सोडण्यात आले आहे.या पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पाटबंधारे विभाग तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. त्याचवेळी विद्युत पुरवठाही खंडित केला जात आहे. कार्यकारी अभियंता आर.एन. देशमुख, महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता निळकंठ गव्हाणे, उप अभियंता बोधनकर आदी अधिकारी, कर्मचारी या पाण्यावर लक्ष ठेवून आहेत.नांदेड शहरासाठी असलेली पर्यायी पाणीपुरवठा योजनाही सध्या सुरु आहे. इसापूरचे दोन दलघमी पाणी ८ एप्रिल रोजी पोहोचले होते. या पाण्यातून २५ दिवसांची तहान भागणार आहे.इसापूरमधून आणखी अडीच दलघमी पाणी मे महिन्यामध्ये घेतले जाणार आहे. विष्णूपुरी आणि आसनेत उपलब्ध होणाºया पाण्यातून नांदेडकरांना उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था महापालिका करीत आहे. यापूर्वीच नियोजन केल्यामुळे सध्यातरी पाण्याचा प्रश्न उद्भवला नसल्याचे दिसत आहे.मात्र पावसाळा लांबल्यास जूनमध्ये पाण्याची अडचण उद्भवू शकते. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शहरात आजघडीला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. या वेळापत्रकात सध्यातरी कोणताही बदल अपेक्षित नसल्याचेही मनपा पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे शहरातील काही भागांत अद्यापही पाण्यासाठी ओरड सुरु आहे. वेळीअवेळी पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. जलवाहिनीतील गळती, कर्मचाºयांची कमतरता आदी बाबींमुळे पाणीपुरवठा वेळापत्रक विस्कळीत होत असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, यापूर्वी १२ मार्च रोजी दिग्रस बंधाºयातून २५ दलघमी पाणी विष्णूपुरी प्रकल्पात घेण्यात आले होते. त्यावेळी सिंचनाच्या नियोजित पाणी पाळ्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्याने तळ गाठला होता.त्या पार्श्वभूमीवर इसापूर प्रकल्पातून महापालिकेने २ दलघमी पाणी आसना नदीत घेऊन पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराची तहान भागविली होती.१० दलघमी पाण्याची मागणीविष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. सिद्धेश्वरमधून घेण्यात येणाºया १० दलघमीपैकी ५ दलघमी पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे. पाणी येतानाचे लॉसेस मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याचवेळी महापालिकेने लॉसेस वगळता विष्णूपुरी प्रकल्पात १० दलघमी पाणी पोहोचेल इतके पाणी सोडावे, अशी मागणी केल्याचे कार्यकारी अभियंता अंधारे यांनी सांगितले.

टॅग्स :water transportजलवाहतूकvishnupuri damविष्णुपुरी धरण