शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

गरिबीमुळे आठवीतील शुभमची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:41 IST

लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुभम बंडू भंगारे (वय १३) या मुलाने मागील आठवड्यात वडील व बहिणीच्या आजारावरील उपचार व शिक्षणाच्या विवंचनेतून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली़ गरिबी व लहान वयात मोठ्या संकटांचा सामना करण्याची वेळ शुभमवर आल्याने त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

ठळक मुद्देवडील अंथरुणावर : आईचे छत्र हरवलेले; बहिणीला रक्ताचा कर्करोग, घरात वृद्ध आजी

सुरेश जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कमाळाकोळी : लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या शुभम बंडू भंगारे (वय १३) या मुलाने मागील आठवड्यात वडील व बहिणीच्या आजारावरील उपचार व शिक्षणाच्या विवंचनेतून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली़ गरिबी व लहान वयात मोठ्या संकटांचा सामना करण्याची वेळ शुभमवर आल्याने त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़वडील बंडू भंगारे यांना शुभम, नयन व आरती ही तीन अपत्ये़ शुभमच्या आईचा मृत्यू दहा वर्षांपूर्वीच पाण्यात बुडून झाला़ दरम्यान, मोठी बहीण आरती (वय १५ ) हिला रक्ताच्या कॅन्सरने गाठले़ तर वडिलांना अर्धांगवायूचा आजार जडला़ दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळलेल्या वडिलांच्या उपचार व बहिणीच्या आजाराची चिंता लहान वयातच शुभमला सतावत होती. घरात वयोवृद्ध आजी अंजनाबाई व शुभम या दोघांवरच कुटुंबाची जबाबदारी पडली़ घरात कोणीही कमावता व्यक्ती नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली़ अशा परिस्थितीत शुभम आठवीपर्यंत शिकला़ ४ मार्च रोजी शुभम आजी सोबत पाच रूपये किलोप्रमाणे चिंचा फोडण्यासाठी कामावर गेला होता़ दुपारी जेवण करून येतो म्हणून घरी गेलेल्या शुभमने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली़ वर्गात अत्यंत हुशार असलेल्या शुभमने गरिबीला कंटाळून आणि वडील, बहिणीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराशातून आत्महत्या केल्याचे समोर आले़ आजीच्या ओढाताणीमुळे शुभम, नयन व बहीण आरती या भावंडांना कधीही अंगभर कपडे मिळाले नाहीत. शिक्षणासाठी वह्या मिळाल्या नाहीत.़ या सर्वांचा परिणाम शुभमच्या बालमनावर होत होता. तो नेहमी आजीला म्हणायचा, आजी ही वेळ आपल्यावरच का आली असावी? बाबांचा आजार, आमचे सर्वांचा खर्च हे सर्व तू कसे करणार? यात घरात खाण्यासाठी धान्य नाही, रोजगारही मिळत नाही. शुभमचा लहान भाऊ नयन सहाव्या व बहीण आरती नवव्या वर्गात असून त्यांचे शिक्षण व इतर खर्चाच्या ओझ्याखाली आजी अंजनाबाई पुरत्या खचल्या आहेत. दरम्यान, भाजपाचे अनु़ जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारोती वाडेकर तसेच इतर दानशूरांनी भंगारे कुटुंबास मदतीचा हात पुढे केला आहे़