शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

तामशातील कोट्यवधींच्या भूखंडाचे श्रीखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 01:15 IST

तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़

ठळक मुद्देजिनिंग’च्या जमिनीवर प्लॉटिंग : उतारा देण्याचा ग्रामपंचायतीचा सपाटा

लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव : तामसा येथील सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या सुमारे ८ एकर जागेवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्याचा सपाटा तामसा ग्रामपंचायतने चालविला आहे़ अनेकांनी कोट्यवधी रुपयांची ही जमीन स्वत:च्या खिशात घातली़ जिल्हा तथा तालुका प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे़कै़शंकरराव चव्हाण राज्याचे पाटबंधारेमंत्री असताना १९६४ मध्ये त्यांच्या हस्ते तामसा सहकारी जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना झाली होती़ तामसा येथे मोठी बाजारपेठ तथा कापसाचे उत्पादन जास्त असल्याने कापूस उत्पादकांना फायदा होईल, नागरिकांना बाजारपेठ उपलब्ध होईल या हेतूने जिनिंग प्रेसिंग सोसायटीची स्थापना झाली होती़ या जिनिंगला त्यावेळी वैभव प्राप्त झाले होते़ तामसा ग्रामपंचायतने मागील चार-पाच वर्षापासून ही जागा नावे करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते़ मात्र सहकार आयुक्तांच्या परवानगीचे पत्र लेआऊट नसल्याचे सांगून हा प्रकार आतापर्यंत थांबला होता़ मात्र ग्रामसेवकांना हाताशी धरून एका बड्या नेत्याने प्लॉट स्वत:च्या नावावर करून घेतला़ त्यानंतर उर्वरितांनी बॉण्ड पेपरच्या आधारे प्लॉट नावे करून घेण्याची स्पर्धाच सुरू केली़मागील गुरुवारी रात्रीपासून उर्वरित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यासाठी लोकांची जणू स्पर्धाच लागली़ परिणामी प्रचंड गर्दी होत आहे़ जागा मिळविण्याच्या चढाओढीत वाद निर्माण होत असून शुक्रवारी सकाळी काही लोकांमध्ये हाणामारीही झाली.

 

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेडHomeघर