शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बा-हाळीत शॉर्टसर्किटने आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:45 IST

येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले.

ठळक मुद्देसहा लाखांचे नुकसान ७० तोळे चांदी, चार तोळे सोन्याचे पाणी

बा-हाळी : येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत एक लाख रुपयांसह सोने-चांदी व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले़ ही घटना २२ जून रोजी पहाटे दोन वाजता घडली़ या घटनेत घरात गाढ झोपेत असलेले दांपत्य मात्र बालंबाल बचावले.येथील विश्वनाथ ज्ञानोबा वाडीकर यांचे वडिलोपार्जित कौलारू घर आहे़ या घरास पूर्णपणे लाकडी छत आहे. नेहमीप्रमाणे नवरा-बायको जेवण करून झोपले असता रात्री दोन वाजनंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नीला जाग आली. घरात पूर्णपणे धूर पसरल्याने त्यांना काहीही लक्षात आले नाही़ मात्र मागच्या घरातून येणाऱ्या आगीमुळे त्यांच्या डोक्यावरील छत जळत असल्याचे लक्षात येताच त्या बाजूला झोपलेल्या पतीला उठवत असतानाच त्यांच्या अंगावर विस्तवाचे केंडे पडण्यास सुरुवात झाली.लागलीच कसेबसे दरवाजा काढून नवरा-बायको घराबाहेर आले तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक धावून आले़ मात्र पाण्याची टंचाई असल्याने अनेकजण पिण्यासाठी ठेवलेले पाणी आणून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला़ पण सर्व काही व्यर्थ गेले़ पहाटे तीन वाजता मुखेड येथील अग्निशमन दलाची गाडी आली व आग विझवली़ तोपर्यंत घरातील संसारोपयोगी साहित्य खाक झाले. घराच्या छतास मोठ्या प्रमाणात लाकडी काम असल्यामुळे आगीने वेग घेतला होता.घरात ठेवलेले लाख रुपये जळून खाकया आगीत ७० तोळे चांदी, चार तोळे सोन्याचे पाणी झाले. तसेच मुलांच्या स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासेसची फी देण्यासाठी आणून ठेवलेले एक लाख रुपये जागीच जळून खाक झाले. घरातील फ्रीज, टीव्ही, कुलर, कपाट, तांब्याची भांडी, धान्य, कपडे, घरासमोरील टिनपत्रे असे जवळपास सहा लाखांचे नुकसान झाले. विश्वनाथ वाडीकर व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील कपड्याशिवाय घरातील कुठलीच वस्तू शिल्लक राहिली नाही.

टॅग्स :Nandedनांदेडfireआगelectricityवीज